Lalit Kolhe Jalgaon : शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक सात महिन्यांनी कारागृहाबाहेर येणार, जेलमधूनच लढवली होती निवडणूक.. प्रकरण काय?

Lalit Kolhe bail : ललित कोल्हे यांनी जेलमधूनच जळगाव महापालिकेची निवडणूक जिंकली होती. निवडणुकीवेळीही त्यांना जामीन मिळाला नव्हता. जामीन मिळाल्याने आता ते कारागृहातून बाहेर येणार आहेत.
Lalit Kolhe
Lalit KolheSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव तालुक्यातील मुमराबाद रोडवरील बोगस कॉल सेंटर प्रकरणी गेल्या सात महिन्यापासून कारागृहात असलेल्या जळगावचे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. ललित कोल्हे यांचे पुत्र नगरसेवक पीयुष कोल्हे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

जळगाव पोलिसांना शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावर असलेल्या माजी महापौर कोल्हे यांच्या फार्महाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, जळगाव पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर छापा टाकला होता. त्यातून या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

प्राथमिक चौकशीत, या सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांशी संपर्क साधून त्यांची ऑनलाइन फसवणूक आणि लूट केली जात असल्याचे उघड झाले होते. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध ऑफर्स, डेटाची पडताळणी किंवा सेवांच्या नावाखाली परदेशी नागरिकांकडून पैसे उकळत होते. तपासात यासंदर्भातील ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते.

Lalit Kolhe
Jalgaon Police Station Fight : पोलिस ठाणं बनलं अखाडा! भाजप माजी नगरसेवक अन् युवकांचा तुफान राडा

या प्रकरणी पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तेव्हापासून कोल्हे हे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. ललित कोल्हे हे कारागृहात असतानाच त्यांनी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली. विशेष म्हणजे ते या निवडणुकीत निवडून देखील आले.

दरम्यान, त्यांच्या जामीनासाठी कोल्हे कुटुंबाने सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेच्या निवडणुकीआधी ते जेलमधून बाहेर येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Lalit Kolhe
Jalgaon MC : पक्षाच्या गटनेत्याकडूनच उद्धवसेनेचा गेम, ऐनवेळेला स्वीकृतसाठी भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव केले पुढे

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ललित कोल्हे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ललित कोल्हे यांचे पुत्र पीयुष कोल्हे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. परंतु जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत हाती येत नाही, तोपर्यंत कॅमेरासमोर कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. ललित कोल्हे यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com