Lasalgaon APMC Election : लासलगाव बाजारसमितीचा सत्तासंघर्ष शिगेला, सलग दुसऱ्यांदा निवडणूक रद्द, काय कारण?

Lasalgaon APMC Election : ११ जुलै रोजी लासलगाव बाजरसमितीची निवडणूक रद्द झाली होती. त्यानंतर आज ६ ऑगस्ट होणारी निवडणूक देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Lasalgaon APMC Election : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया यापूर्वी ११ जुलै रोजी ठरली होती. मात्र, तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाडचे सहाय्यक उपनिबंधक कांतीलाल गायकवाड यांची प्रकृती बिघडल्याने नियोजित निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुढची तारीख आज ६ ऑगस्ट देण्यात आली होती. मात्र, आज होणारी निवडणूक देखील स्थगिती करण्यात आली आहे. मात्र, यावेळचं कारण काही वेगळं आहे.

लासलगाव बाजारसमितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आज ६ ऑगस्ट रोजी होणारी पदाधिकारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही निवडणूक येत असल्याने राजकीयदृष्या या निवडणुकीला मोठे महत्व आहे. आजवर भुजबळांच्या पसंतीच्या उमेदवारालाच सभापतीपद मिळाल्याचा इतिहास आहे. परंतु सलग दुसऱ्यांदा निवडणूक रद्द झाल्याने नाशिक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधकांचा २० जुलैचा आदेश आणि सहाय्यक निबंधकांनी २७ जुलै रोजी काढलेली निवडणूक नोटीस पुढील सुनावणीपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal
Nashik Pune Railway : नाशिक-पुणे थेट रेल्वेसाठी CM फडणवीस मैदानात, डॉ. काकोडकर समिती नियुक्त; तांबे रास्ता रोकोवर ठाम!

बाजारसमितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी आपल्या राजीनाम्यावरील हरकत प्रलंबित असतानाही तो मंजूर झाल्याचे गृहीत धरून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा दावा करत पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.

राजीनाम्याच्या वैधतेबाबत निर्णय न घेता निवडणूक घेतल्यास अपूरणीय नुकसान होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर सुनावणी घेतल्यानंतर प्रकरणात प्रथमदर्शनी सविस्तर सुनावणी आवश्यक असल्याचे नमूद करत विद्यमान स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांचा आदेश व निवडणुकीची नोटीस पुढील आदेशापर्यंत स्थगित राहणार आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मंत्रालयात होणार असून, संबंधित पक्षकारांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बाजार समितीतील सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून, पदाधिकारी निवडीबाबतचा निर्णय आता सुनावणीनंतरच होणार आहे.

Chhagan Bhujbal
Nashik Politics : नाशिकमध्ये खड्ड्यांपेक्षा राजकारण खोल : महाजनांच्या 'स्टार रेट'मुळे महापौर एकाकी; कंत्राटदारांचा बैठकीवर बहिष्कार

लासगाव बाजार समितीत सध्या जयदत्त होळकर व ज्ञानेश्वर जगताप(डी.के) या दोघांचा एक गट आहे. तर दुसरा गट माजी जिल्हापरिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचा आहे. दोन गटात सभापती व उपसभापती पदासाठी रस्सीखेच आहे. आकड्यांचा विचार केला तर थोरे गटाकडे दहा सदस्यांचे संख्याबळ, तर जगताप-होळकर गटाकडे आठ सदस्य आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com