Nashik Pune Railway : नाशिक-पुणे थेट रेल्वेसाठी CM फडणवीस मैदानात, डॉ. काकोडकर समिती नियुक्त; तांबे रास्ता रोकोवर ठाम!

Devendra Fadnavis Announces Anil Kakodkar Committee : रेल्वेमंत्री वैष्णव यांनी हा मार्ग रद्द केल्याची घोषणा केली होती. नाशिक पुणे ऐवजी शिर्डी आणि नगर मार्गे पुणे रेल्वे मार्ग होईल असे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्ग गेल्या काही दिवसापासून राजकीय वादाचा विषय बनला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी त्याला नकार जाहीर केला. त्यावरून नवा वाद उभा राहिला आहे.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग हा गेली अनेक वर्ष रेंगाळला आहे. गेल्या काही वर्षात त्याला चालना मिळाली होती. संगमनेर राजगुरुनगर आणि अन्यत्र त्यासाठी भूसंपादन देखील झाले होते. यासंदर्भात संबंधित खासदारांनी पाठपुरावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी मात्र रेल्वेमंत्री वैष्णव यांनी हा मार्ग रद्द केल्याची घोषणा केली होती. नाशिक पुणे ऐवजी शिर्डी आणि नगर मार्गे पुणे रेल्वे मार्ग होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या रेल्वेचा मूळ हेतू आणि नागरिकांची सोय दोन्हींना हरताळ फासला गेला.

संगमनेर आणि लोणी येथील राजकीय नेत्यांच्या वादातून हे राजकारण घडल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील खासदारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत आंदोलनाची घोषणा केली होती. आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रश्नावर आग्रही भूमिका घेतली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पुढे आले आहेत. त्यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गसाठी अनुकूल भूमिका घेतली. त्यासाठी तज्ज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्याची घोषणा केली.

Devendra Fadnavis
Satyajeet Tambe : नाशिक पुणे रेल्वेमार्गासाठी आमदार सत्यजित तांबे रस्त्यावर उतरणार, जनआंदोलनाची तारीख ठरली ...

रास्ता रोको होणार...

नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, चाकण मार्गे पुणे असा अपेक्षित आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी तो अत्यंत अनुकूल आणि उपयुक्त आहे. याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी येथे 9 ऑगस्ट ला रास्ता रोको करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तज्ज्ञ समिती नियुक्त झाली तरीही 9 ऑगस्ट च रास्ता रोको आंदोलन होणारच असा इशारा आमदार तांबे यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis
Satyajeet Tambe Chakka Jam : पुणे-नाशिक रेल्वेसाठी सत्यजीत तांबेंची आता आरपारची लढाई; 9 ऑगस्टला 'चक्काजाम' ठरला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com