Lasalgaon APMC Election : एक याचिका देणार भुजबळांना धक्का? बिघडू शकतात लासलगाव बाजार समितीची सगळी गणितं

Lasalgaon Market Politics : या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी १५ एप्रिलला आहे. त्यात याचिकाकर्त्याच्या बाजुने निकाल लागल्यास सभापती व उपसभापतीची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे.
Nashik Update
Nashik UpdateSarkarnama
Published on
Updated on

Lasalgaon APMC Updates : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापती पदाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होणार आहे. मात्र, निवडणूक झाल्यानंतरही नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांच्या निवडीवर टांगती तलवार कायम असणार आहे. कारण या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी १५ एप्रिलला आहे. त्यात याचिकाकर्त्याच्या बाजुने निकाल लागल्यास सभापती व उपसभापतीची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत व्यापारी व आडते गटातील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी निवडणुकीस आक्षेप घेतल्याने गेली 4 महिने निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीला परवानगी दिली आहे. याचिकाकर्ते ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी सोमवारी (दि. ७) म्हणणे मांडण्यासाठी वेळ माघितल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. मात्र, ही निवडणूक न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही अनिश्चितता कायम राहणार आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीचे जिल्हा उपनिबंधक, प्राधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य शासनाच्या सचिवांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले.

Nashik Update
Kirit Somaiya Politics: धक्कादायक...मालेगाव आणि पश्चिम बंगालमध्ये आहे हे कनेक्शन!

काय आहे प्रकरण?

सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना व अडत्यांना दोन मते देण्यात आली, पण लासलगावमध्ये त्याला नकार दिला गेला. हाच मुद्दा याचिकाकर्ते गांगुर्डे यांनी उपस्थित केला आहे. एकाच जिल्ह्यातील दोन संस्थांना वेगवेगळा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी गांगुर्डे यांनी न्यायालयात वेळ मागितला आहे.

याचिकाकर्त्यांच्या बाजुने निकाल लागल्यास...

त्यामुळे ११ एप्रिलला जरी बाजार समितीची निवडणूक असली तरी १५ एप्रिलला सुनावणी असल्याने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक रद्द होण्याची भीती कायम राहणार आहे. कारण याचिका कर्त्यांच्या बाजूने निकाल लागल्यास सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द होऊ शकते. तसेच बाजार समितीच्या व्यापारी गटाची फेरनिवडणूक होण्याची किंवा संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातून या निवडणूकीची सगळीच गणितं बदलणार आहेत.

Nashik Update
Congress Politics : काँग्रेसकडे हक्काचा मतदार, पण 2 कारणांमुळे आला शुन्यावर; 'स्थानिक'च्या निवडणुकीत मुसंडी मारणार?

कोण होणार सभापती?

दरम्यान सभापती पदासाठी डी.के.जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. पहिल्या टर्म मध्ये जगताप यांना संधी देऊन त्यानंतर जयदत्त होळकर व पंढरीनाथ थोरे यांनाही प्रत्येकी एक एक वर्ष सभापती पद दिलं जावू शकतं. डॉ. श्रीकांत आवारे यांना उपसभापती पद दिलं जावू शकतं. या निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ यांचा प्रभाव असल्याने त्यांचीही भूमिका महत्वाची असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com