सतेज पाटलांना 22 दिवसांत अस्मान दाखविणारे अमल महाडिकच किल्ला लढविणार!

पराभवांचे विधान परिषद निवडणुकीत उट्टे काढण्यासाठी महाडिक परिवार सरसावला आहे.
Satej Patil, Amal Mahadik
Satej Patil, Amal Mahadiksarkarnama
Published on
Updated on

कोल्‍हापूर : विधान परिषद (Legislative Council) निवडणुकीसाठी कोल्हापूरात पुन्हा एकदा माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) असाच सामना रंगणार आहे. कारण भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. महाडिक आणि पाटील या पारंपारिक विरोधकांमुळे विधान परिषद निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

अमल महाडिक यांनी २०१४ मध्ये तत्‍कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात कोल्‍हापूर दक्षिणमधून निवडणूक लढवली होती. अवघ्या २२ दिवसांमध्ये प्रचार करून त्यांनी पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत महाडिक यांना पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच बरोबर नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीतही सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिक पॅनेलचा पराभव केला. या सर्व पराभवांचे विधान परिषद निवडणुकीत उट्टे काढण्यासाठी महाडिक परिवार सरसावला आहे. यातूनच अमल महाडिक यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचे निश्‍चित करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Satej Patil, Amal Mahadik
२८ जणांना सोबत घेऊन रांजणे नॉट रिचेबल : शशीकांत शिंदेंचे वाढले टेन्शन!

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीची घोषणा ९ नोव्‍हेंबरला झाली. यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्‍हणून पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र ऐत प्रचाराच्या नियोजनासाठी बैठकही घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली होती. त्यावेळी उमेदवार म्‍हणून सुरेश हाळवणकर, जिल्‍हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रा. जयंत पाटील आदी नावांवर चर्चा झाली. चर्चेतून जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आले होते. उमेदवारीवरून बरीच खलबते झाली. त्यानंतर जिल्‍हा परिषद सदस्य, पालिकांचे नगरसेवक व भाजपच्या मित्र पक्षांचे नेते यांची मते आजमावून घेण्यात आली. यानंतर उमेदवारीसाठी अमल महाडिक यांचे नाव पुढे आले.

Satej Patil, Amal Mahadik
`फडणवीसांकडे यायचं, चहा पिऊन पाठिंबा घेऊन जायचा, असं होणार नाही`

सोमवारी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह नेते उपस्‍थित होते. या बैठकीत कोल्‍हापूर विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अमल महाडिक यांच्या नावावर चर्चा होऊन ते अंतिम शिक्‍कामोर्तब करण्यासाठी दिल्‍लीला पाठवण्यात आले. दोन दिवसांत भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उमेदवारीसाठी नाव अंतिम असल्याने महाडिक कुटुंबाने मतदारांच्या गाठीभेटीवर जोर वाढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com