Election 2024 : विखेंकडून डमी उमेदवार, डाव उलटवण्याचे पुरावे आमच्याकडे; राजेंद्र फाळके गरजले

MahaVikas Aghadi News महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नीलेश लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे खासदार विखे यांचे रडीचे राजकारण असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Sujay Vikhe, Rajendra Phalke
Sujay Vikhe, Rajendra PhalkeSarkarnama

Ahmednagar Political News : पारनेरच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नीलेश साहेबराव लंके (रा. कामोठा, जिल्हा. रायगड) यांच्या नावाचा समावेश करून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य साधून महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी हे डमी राजकारण खेळण्याचा आरोप आघाडीने केला आहे.

विखे परिवाराची 50 वर्षांची डमी राजकारणाची परंपरा खासदार विखेंनी (Sujay Vikhe) या वेळी कायम राखली. खासदार विखे यांच्या या रडीच्या नावाची पोलखोल करणारे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

Sujay Vikhe, Rajendra Phalke
Nashik Lok Sabha : अपक्षांची 'तुतारी' राष्ट्रवादीसाठी अडचणीची !

नगर राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, आम आदमी पक्षाचे संघटक सुभाष केकाण आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. विखे परिवाराने नगर जिल्ह्यात 50 वर्षे डमी राजकारणच केले. खासदार विखे यांचे सख्खे चुलते डॉ. अशोक विखे यांनी त्यांच्या डिग्री डमी असल्याचा उल्लेख केला होता. संपत्तीसाठी रक्तातील नाव भासवून भावाच्या ठिकाणी डमी व्यक्ती दिला होता. हेच काय, आत्ताच्या तलाठी भरतीमध्येदेखील अनेक जण डमी उमेदवार पास झालेत, अशी टीका फाळके यांनी केली.

आत्ताच्या लोकसभा निवडणुकीतदेखील नीलेश ज्ञानदेव लंके (Nilesh Lanke) यांनी विखे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यातून विखे परिवार पुरता हादरला आहे. त्यामुळे खासदार विखे यांनी नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नीलेश साहेबराव लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डमी उमेदवार नीलेश साहेबराव लंके हे मूळचे कामोठा, रायगड जिल्ह्यातील आहे. परंतु सुधारित मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानेदेखील नावाचा समावेश करण्यामध्ये दाखवलेली तत्परता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करते, असे राजेंद्र फाळके यांनी म्हटले.

Sujay Vikhe, Rajendra Phalke
Lok Sabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसला मोठा दिलासा, एकाच दिवशी दोन गुड न्यूज!

राजेंद्र फाळके यांनी नीलेश साहेबराव लंके यांच्या अर्जाचे प्रतिज्ञापत्र आणि खासदार सुजय विखे यांचे प्रतिज्ञापत्र एकाच व्यक्तीकडून घेतल्याचा उल्लेख केला आहे. डी. पी. अकोलकर यांच्याकडून हे दोन्ही प्रतिज्ञापत्र घेतलेले आहेत. हा निव्वळ योगायोग नाही. यातून नीलेश साहेबराव लंके हा विखेंनीच डमी उमेदवार उभा केला असून, हा पुरावा आहे, असे सांगून मतदारांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा रडीचा डाव खासदार विखे खेळले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नीलेश साहेबराव लंके (रा.कामोठा, जि. रायगड) यांच्याकडून जाहीर पाठिंबा घेऊन खासदार विखे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात, असा आरोप फाळके यांनी केला.

माझ्याकडेदेखील दोन सुजय विखे संपर्कात होते. हे दोन्ही सुजय विखे लोणीमधील आहेत. सुजय रमाकांत विखे आणि सुजय दिगंबर विखे यांनी डमी अर्ज भरण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु आम्ही डमी राजकारणामध्ये स्वारस्य दाखवले नाही. चुकीचा आणि रडीचा डाव आम्ही खेळून या निवडणुकीत सामोरे जाणार नाही आणि विखे यांनी जे डमीचे राजकारण खेळून नीलेश साहेबराव लंके (रा.कामोठा, जि. रायगड) यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावर हरकतदेखील घेणार नाही. मात्र विखेंच्या डमी राजकारणाची पोलखोल मतदारांमध्ये वारंवार करत राहू, असा इशारा राजेंद्र फाळके यांनी या वेळी दिला.

(Edited By - Rajanand More)

R

Sujay Vikhe, Rajendra Phalke
Dr Bharati Pawar : सरकारच्या 'त्या' निर्णयाने भारती पवारांच्या अडचणी वाढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com