Hemant Godse News : काँग्रेस-ठाकरे गटानं गोडसेंना फोडला घाम? उमेदवार करत आहेत आकडेमोड!

Hemant Godse Vs Rajabhau Waje : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात दोन लाखांच्या आसपास मतदार आहेत. त्यांचं मताधिक्य ठरवणार नाशिकचे खासदार गोडसे की वाजे?
hemant godse
hemant godsesarkarnama

Nashik News, 25 May : नाशिक मतदारसंघात ( Nashik Lok Sabha Constituency ) महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात सरळ सामना आहे. त्यात अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज किती शेज लावतात याचीही उत्सुकता आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांना येथून मोठ्या आघाडीची अपेक्षा आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रदीर्घकाळ वर्चस्व आहे. काँग्रेस ( Congress ) हा या मतदारसंघातील मुख्य राजकीय पक्ष आहे. आजवरच्या निवडणुका हे दोन पक्ष लढत आले आहे. राज्यात घडलेल्या तोडफोडीच्या राजकारणाने निर्माण झालेल्या परिस्थितीत हे दोन्ही पक्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्यासाठी हातात हात घालून मैदानात उतरले होते. त्यामुळे त्यांच्याकडून मतदानात मोठा चमत्कार अपेक्षित आहे.

लोकसभा 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांना येथून मोठी आघाडी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ ( Sameer Bhujbal ) यांना त्यांनी शेवटच्या चार दिवसात मागे टाकले होते. त्यात प्रामुख्याने शिवसेनेची ताकद काँग्रेसचा छुपा पाठिंबा आणि मराठा कार्ड या गोष्टी अंतर्भूत होत्या. यंदा ही राजकीय अनुकूलता खासदार गोडसे यांच्यासाठी प्रतिकूल बनली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात मोठी फूट पाडण्यात शिंदे गटाला इगतपुरीमध्ये यश आलेले नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची येथे प्रभाव टाकतील एवढी क्षमता येथे नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार गोडसे हे व्यक्तिगत संपर्कातील नेत्यांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या यंत्रणेवर ही निवडणूक लढत होते. माजी आमदार पांडुरंग गांगड आणि काशिनाथ मेंगाळ, संपत काळे, पांडुरंग बरे, पांडुरंग गांगड आणि रमेश गायकर यांनी केलेले नियोजन ही त्यांची यंत्रणा होती. त्यात अँटीइन्कमबन्सी देखिल होती.

खासदार गोडसे यांना अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळाली. वाजे ( Rajabhau Waje ) यांची उमेदवारी 27 मार्चला जाहीर झाली होती. या महिन्याभराच्या प्रचारात त्यांनी प्रचंड आघाडी घेतली. खासदार गोडसे यांचे समर्थक देखील या काळात वाजे यांना जॉईन झाले होते. त्यातले फार कमी लोक गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यावर परत आले. परिणामी गोडसे चाचपडताना दिसत होते. त्या तुलनेत वाजे अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रभावी यंत्रणेसह इगतपुरी पिंजून काढत होते. वाजे यांच्या विषयी इगतपुरी तालुक्यात आपलेपणा आहे. तसेच, इगतपुरीचे भाचे म्हणून गोडसे यांच्या विषयीचा जिव्हाळा देखील आहे. त्यामुळे ही निवडणूक नातेसंबंधाच्या जिव्हाळ्यात बरोबरीची व्हायला हवी होती. प्रत्यक्षात शेतकरी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड नाराज होता. ती नाराजी इगतपुरीत मतदानातून व्यक्त झाल्याचे बोलले जाते.

या लढाईत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे अन्य हितसंबंध व राजकीय अडथळा नसल्याने मनापासून वाजे यांचा प्रचार करीत होते. त्यांना माजी आमदार निर्मलाताई गावित यांची साथ होती. इगतपुरीमध्ये हे दोघेही प्रमुख राजकीय गट आहेत. संपत सकाळे, संदीप गुळवे, पांडुरंग शिंदे, राजाराम नाठे हे प्रमुख पदाधिकारी वाजे यांच्या प्रचारात सक्रिय होते. त्याचा परिणाम आणि प्रभाव उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या सभेत दिसून आला. त्यामुळे गोडसे गेल्या वेळेची आघाडी मिळविण्यासाठी खूप हातपाय मारावे लागतील, तशी अनुकूलता नव्हती, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

hemant godse
Hemant Godse Vs Rajabhau Waje News : नाशिकमध्ये शिंदेंचे गोडसे की ठाकरेंचे वाजे ? राजकीय विश्लेषकांचं नेमकं म्हणणे काय ?

शेवटच्या दोन दिवसात निवडणूक फिरविण्यासाठी गोडसे यांच्या यंत्रणेने सर्व अस्त्र आणि शस्त्र बाहेर काढले होते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी 'तो' नेहमीचा प्रयोग झाला. त्याला काही प्रमाणात यश देखील आल्याचे दिसते. सायंकाळी उशिरा मतदारांची झुंबड उडाली. वायघोळपाडा येथे रात्री 8 पर्यंत, खंबाळे येथे साडे सात पर्यंत मतदान सुरू होते. यावरून त्याचा अंदाज बांधता येईल. मात्र, ते प्रमाण किती? लक्षणीय नक्कीच नाही. या मतदारसंघात एक लाख 97 हजार 975 असे 72.24 टक्के मतदान झाले आहे. मतदारांचा वाढलेला टक्का प्रस्थापित सरकार विरोधातील संताप की खासदारांच्या कामकाजाला पसंती, हे मतमोजणीत स्पष्ट होईल.

( Edited By : Akshay Sabale )

hemant godse
Nashik Loksabha Election : '...त्याचा खूप मोठा फायदा आमच्या दोन्ही उमेदवारांना झाला' ; दादा भुसेंचं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com