Chhagan Bhujbal News : उद्धव ठाकरे अन् शरद पवारांबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट; भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal On Narendra Modi : "मजबूत सरकारसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजेत," असं मतंही भुजबळांनी मांडलं
uddhav thackeray sharad pawar chhagan bhujbal
uddhav thackeray sharad pawar chhagan bhujbalsarkarnama

महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या कालावधीत दोन पक्षात उभी फूट फडली. केंद्रीय निवडणूक आयोगानं ( Election Commission ) उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष काढून घेत विधिमंडळातील बहुतमच्या जोरावर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना दिला. तर, ज्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तोही पक्ष अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या ताब्यात गेला आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जातं. मात्र, विरोधकांकडून हा दावा सातत्यानं खोडण्यात आला. यातच आता महायुतीतीत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

"शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दत जनतेत सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना प्रतिसाद मिळत आहे," असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार ( Sharad Pawar ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) 'एनडीए'ला किती नुकसान पोहचवत आहेत? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, "2014 आणि 2019 सारखी राजकीय परिस्थिती सध्या राज्यात नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. पण, नरेंद्र मोदी सरकार बनवतील, असा मला विश्वास आहे. मजबूत सरकारसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजेत."

uddhav thackeray sharad pawar chhagan bhujbal
Sharad Pawar news : शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार मैदानात; म्हणाले, "अटक झाल्यास..."

"भाजपकडून '400 पार'चा नारा संविधान बदलण्यासाठी दिला जातो, हा विरोधकांचा प्रचार जोरात सुरू आहे. '400 पार'चा नारा संविधान बदलासाठी दिला जातोय, असं मत जनतेत बनलं आहे. कर्नाटकतील भाजप खासदारानं ( अनंतकुमार हेडगे ) संविधान बदलाबाबत भाष्य केलं होतं. मात्र, 'संविधान बदलता येत नाही,' असं पंतप्रधान मोदी सांगतात. पण, संविधानबदलाबद्दल जनतेत प्रचार होत आहे. याचा किती परिणाम जनतेत होतो, हे मतदानपेटी उघडल्यावर समजेल," असं छगन भुजबळांनी सांगितलं.

uddhav thackeray sharad pawar chhagan bhujbal
Sharad Pawar News : शरद पवारांचा राहुरीमधील सभेतून पंतप्रधान मोदी अन् विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com