Lok Sabha Election 2024 News : रावेर लोकसभेसाठी बारामती पॅटर्न; खडसे नणंद-भावजयीत लढतीची शक्यता

Political News : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पेच निर्माण झाला आहे.
Raksha khadse, Eknath khadse, rohini khadse
Raksha khadse, Eknath khadse, rohini khadse Sarkarnama

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात पेच निर्माण झाला आहे. पक्षातर्फे एकनाथ खडसे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तब्येतीमुळे त्यांनी नकार दिला आहे. आता पक्षातर्फे त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. त्यांची मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे या दोन वेळा निवडून आल्या आहेत. आता तिसऱ्यांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे मात्र भाजपतच होत्या. त्यांनी पक्षाचे कार्य सुरू ठेवीत जनसंपर्कही कायम ठेवला आहे. (Lok Sabha Election 2024 News)

Raksha khadse, Eknath khadse, rohini khadse
Raosaheb Danve News : सभापती ते रेल्वे राज्यमंत्री, दानवेंच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार ठरणार 'इंजिन'

राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष झाला तरीही रक्षा खडसे यांनी मात्र कधीही त्यात आपला हस्तक्षेप केला नाही. या वादात त्या पडल्या नाहीत. खासदार म्हणून त्यांचे कार्यही चांगले होते, मतदारसंघातील वाड्या, वस्ती या ठिकाणीही भेटी देऊन लोकांशी संपर्क ठेवला. मतदारसंघातील प्रश्‍नाची सोडवणूक करण्याकडेही त्यांनी लक्ष दिले. त्यांच्याबाबत मतदारसंघात व भाजपतील नेतृत्वातही नाराजी दिसून आली नाही. त्यामुळे केवळ ‘खडसे‘ नावामुळे त्यांची भाजपतील उमेदवारी रद्द होऊ शकते अशी चर्चा होती.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे स्वत: एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात उतरण्याची तयारी दाखविली होती. पक्षातर्फे उमेदवारीसाठी त्यांचा ठराव करूनही पाठविण्यात आला होता. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे आपण लढू शकणार नाही, असेही एकनाथ खडसे यांनी कळविले होते. जर डॉक्टरांनी सांगितले आपण लढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आता तब्येतीच्या कारणावरून त्यांनी लढण्यास असमर्थतता दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपकडून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडे एकनाथ खडसे यांनी तब्येतीच्या कारणाने नकार दिल्यामुळे पक्षातर्फे उमेदवारीसाठी एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड. राेहिणी खडसे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे बारामती येथे होत असलेली पवार नणंद-भावजयीची लढत मुक्ताईनगरातही खडसे नणंद-भावजयीत होणार काय? याबाबत आता चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निर्माण झाला आता पेच

ॲड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी लोकसभेची दावेदारी केलेली नाही, मुक्ताईनगर विधानसभेसाठीच त्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी घेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रमेश पाटील आदींची नावे चर्चेत आहेत. उमेदवार ठरविण्याबाबत आता पक्षाच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेसनेही मतदारसंघात मागणी केली असून, रावेर येथील कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी (Shirish Choudhri), चोपडा येथील संदीप पाटील, जगदीश पाटील हे उमेदवार असल्याचा दावाही पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) उमेदवारीचा पेच पाहता कॉंग्रेसकडेही ही जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Raksha khadse, Eknath khadse, rohini khadse
Eknath Khadse News : सूनबाईच्या हाकेला नाथाभाऊ साद घालणार का ?

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com