Raosaheb Danve News : सभापती ते रेल्वे राज्यमंत्री, दानवेंच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार ठरणार 'इंजिन'

Raosaheb Danve Latest News : रेल्वेमंत्री म्हणून रावसाहेब दानवेंनी जालना-जळगाव हा नवीनच रेल्वे मार्ग मंजूर करून आणला.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

जालना : 14 मार्च | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांना जालना लोकसभा मतदारसंघातून ( Jalna Lok Sabha Constituency ) भाजपने सहाव्यांदा उमेदवारी दिली. अर्थात तीअपेक्षित असल्यामुळे त्यांचे कुणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. पण, एकाच मतदारसंघात सलग सहाव्यांदा पक्षाकडून उमेदवारी देणे ही त्या उमेदवारासाठी अभिमानाचीच गोष्ट ठरते. 35 ते 40 वर्षांच्या आपल्या राजकीय प्रवासात रावसाहेब दानवे यांनी गावचा सरपंच, पंचायत समिती सभापती, तीन वेळा विधानभा निवडणूक लढवून दोनदा आमदार, पाच वेळा सलग खासदार आणि केंद्रात दोनदा राज्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली.

Raosaheb Danve
Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात 'चारशे पार' प्रचंड बहुमताने पुन्हा भेटू...

संघटनेच्या पातळीवरही रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांना राज्याचे प्रमुख असलेले प्रदेशाध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासात रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच लक्षात राहण्यासारखी ठरली. महाराष्ट्र आणि मराठवाड्याला आतापर्यंत सर्वाधिक रेल्वे विकासाची कामे आणि त्यासाठी लागणारा हजारो कोटींचा निधी पहिल्यांदा मिळाला. याची आठवण कायम मतदारसंघातील लोकांच्या मनात राहावी, यासाठी रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर एका रेल्वे इंजिनची प्रतिकृती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे रेल्वे इंजिन रावसाहेब दानवे यांच्या पंचायत समिती सभापती ते रेल्वे राज्यमंत्री पदापर्यंतच्या त्यांच्या राजकीय प्रवासाची आठवण करून देणारे ठरणार आहे. सध्या हे रेल्वे इंजिन भोकरदनकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची दानवेंवर कृपादृष्टी झाली आणि जालना व संभाजीनगर मतदारसंघात पाच हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांची भेट त्यांना मिळाली. दानवे यांनी थेट आपल्या मूळ गाव जवखेडा खुर्द येथूनच राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून तो प्रत्यक्षातही आणला.

जालना लोकसभा मतदारसंघात महामार्ग आणि रस्त्यांचे विस्तारलेले जाळे त्यांनी केलेल्या विकासकामांतील एक मैलाचा दगड ठरत आहे. ज्या जवखेडा गावातून विद्यार्थिदशेत पायपीट केल्याचे दानवे आपल्या भाषणातून वारंवार सांगतात, आज त्याच गावातून त्यांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग नेला. रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी जालना-जळगाव हा नवीनच रेल्वेमार्ग मंजूर करून आणला. राज्य मंत्रिमंडळाने जालना-जळगाव रेल्वेमार्गाला मान्यता दिली असून, अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूदही केली.

Raosaheb Danve
Jalgaon News : खानदेशातील चार पैकी तीन खासदार कायम; उन्मेश पाटलांचा पत्ता कापला

एकीकडे मराठवाडा वर्षानुवर्षे रेल्वेच्या बाबतीत मागासलेला, अशी ओळख असताना दानवेंनी पीट लाइन, ड्रायपोर्ट व जालना- जळगाव आणि आता जालना- खामगाव रेल्वेमार्गांना मंजुरी मिळवत, आपल्याला मिळालेल्या रेल्वे खात्याची छाप पाडली. जालना-जळगाव रेल्वे प्रत्यक्षात धावण्यासाठी अनेक वर्षे लागणार असली तरी भोकरदनमध्ये रेल्वे इंजिन आणत दानवे यांनी भोकरदनवासीयांना एक स्वप्न दाखवले आहे.

दानवेंची भोकरदनच्या राजकारणात खरी ओळख निर्माण झाली ती पंचायत समितीच्या सभापती पदापासून. त्याच पंचायत समितीच्या प्रांगणात रावसाहेब दानवे यांनी प्रत्यक्षात रेल्वे इंजिन आणून बसवले. रेल्वे इंजिनची ही प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. पंचायत समितीच्या प्रांगणात रेल्वे इंजिनच्या आसपासचा परिसर व त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Raosaheb Danve
Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेने भाजप कोमात, ठाकरे गट जोमात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com