Poonam Mahajan News : पूनम महाजनांच्या उमेदवारीसाठी नगरमध्ये कुणी उचललं मोठं पाऊल..?

Loksabha Election 2024 : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीसाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये आक्रमक पवित्रा उचलण्यात आला आहे.
Poonam Mahajan
Poonam MahajanSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीसाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डीमधील समर्थकाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले. पूनम महाजन यांच्या उमेदवारीसाठी पाथर्डीतून भाजप पक्षश्रेष्ठांनी एका समर्थकाने पत्र पाठवल्याने चर्चाचा विषय ठरला आहे. तर या पत्राची पक्ष दखल घेईल का, याची देखील उत्सुकता वाढली.

खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्यापही भाजपकडून कोणताही निर्णय घेतलेला नाही. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारल्यास उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी द्यायची कोणाला या पर्यायांवर पक्षात विचारविनिमय सुरू आहे. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुंबईत पक्षाचे सध्या तीन खासदार आहेत. यापैकी गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक या दोन्ही विद्यमान खासदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. पूनम महाजन यांच्याबाबत पक्षाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

Poonam Mahajan
Lok Sabha Election 2024 : 'एक्झिट, ओपिनियन पोल'बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा असली, तरी शेलार दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. यातूनच पर्यायांबाबत विचार सुरू असल्याचे समजते. मुंबईत 20 मे रोजी निवडणूक असून, 26 एप्रिल ते 3 मे रोजी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

यातच खासदार पूनम महाजन यांची लोकसभेची उमेदवारी कायम ठेवावी, अशा आशयाचे पत्र पाथर्डी येथील कार्यकर्ते प्रा. सुनिल पाखरे यांनी राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना पाठवले आहे. खासदार पूनम प्रमोद महाजन यांचा भारतीय जनता पक्षातील इतिहास व पार्श्वभूमी पाहता आज घडीला त्यांच्या पूर्वजां इतके योगदान महाराष्ट्रातील कोणत्याही नेतृत्वाचे नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी पंतप्रधान अटलजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला सत्ताधीश करण्याचे योगदान प्रमोद महाजन यांचे आहे. पक्ष वाढीचे अविरत कार्य जोपासत असतांना वेळ, श्रम, बुद्धी, धन व कौशल्य यांचे पंच दान समर्पित करून पक्षाचा संपूर्ण देशभर प्रसार प्रमोद महाजन यांनी केला.

भारतातील तरुणांचे ते आदर्श प्रेरणास्थान होते. संसदरत्न खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी एक दशक संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे पेलवली आहे. हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असलेल्या या संसदरत्नाचे लोकसभा मतदारसंघातील कार्य हे लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान आहे. विकासाभिमुख मतदार संघ बनवताना महिलांचे सबली करण झालेले आहे.

Poonam Mahajan
Hemant Godse : मुख्यमंत्री शिंदेंनी भेट टाळली, हेमंत गोडसेंचा मोठा निर्णय; छगन भुजबळांसह भाजपला इशारा

महिलांच्या सक्षमी कारणाचा नारा भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. तर येणाऱ्या कालखंडासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना त्या समर्थ व प्रबळ पर्याय आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत धक्का तंत्र व षडयंत्र करून त्यांची उमेदवारी कापण्याचे पाप करू नका. अन्यथा मतदारराजा माफ करणार नाही. मी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्यामुळे या पत्राचा गांभीर्य महत्वाचा प्रश्न समजून हा विषय तत्काळ मार्गी लावावा.

(Edited By Deepak Kulkarni

Poonam Mahajan
Madha Lok Sabha Constituency : शरद पवारांनी वाढविले मोहिते पाटलांचे टेन्शन; माढ्यातून तुतारी मिळणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com