Nashik Loksabha Election 2024 : ठाकरेंनी मारले एका दगडात दोन पक्षी, आता वाजेंविरोधात गोडसे की भुजबळ?

Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा कधी नव्हे एवढी राजकीय चुरस आणि अंतर्गत स्पर्धा पाहायला मिळत आहे.
Chhagan Bhujbal | Rajabhau Waje | Hemant Godse
Chhagan Bhujbal | Rajabhau Waje | Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje Vs Chhagan Bhujbal News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नाशिकमधून राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे वाजे विरुद्ध अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अशी लढत होईल. ही निवडणूक राज्यभर चर्चेचा केंद्र ठरेल, अशी चिन्हे आहेत.

सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) हे एक लो प्रोफाइल हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून परिचित आहेत. एक चारित्र्यसंपन्न व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे. वैद्यकीय क्षेत्रात आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सर्व दूर परिचित आहे.

गेल्या टर्ममध्ये ते सिन्नरचे आमदार होते. भुजबळांचे (Chhagan Bhujbal) ओबीसी कार्ड आणि वाजे यांची सर्व समावेशक प्रतिमा असा संदेश देणारी उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जाहीर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघात यंदा कधी नव्हे एवढी राजकीय चुरस आणि अंतर्गत स्पर्धा पाहायला मिळत आहे. सध्या या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. पण, महायुतीचा घटक असलेल्या या पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजप आणि अजित पवार गटाने केले. त्यातून महायुतीत प्रत्यक्ष निवडणुक सुरू झाल्यावर तीनही घटकांचे मनोमिलन कसे होणार, अशी सध्याची समस्या आहे.

भुजबळ हे अनपेक्षित उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. मात्र, त्यांची उमेदवारी व्हावी, म्हणून गेली काही महिने सातत्याने अतिशय व्यवस्थित डावपेच आखले जात होते. आता ते प्रत्यक्षात आल्याचे दिसते. त्यांच्या उमेदवारीने किमान चर्चेत तरी एक बलाढ्य उमेदवार मिळाला असा संदेश देण्यात महायुती यशस्वी होणार आहे. अर्थात त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

नाशिक मतदारसंघात संत जनार्दन स्वामींचे शिष्य शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सिद्धेश्वरानंद हेदेखील उमेदवार असतील.

भाजपचे दिनकर पाटील (Dinkar Patil) हेदेखील अदृश्य शक्तीच्या पाठिंब्यावर उमेदवारी करू शकतात, बोलले जाते. त्यामुळे भुजबळ विरुद्ध वाजे अशी प्रमुख लढत होईल. भुजबळ उमेदवार असल्याने त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही त्वेषाने प्रचारात उतरतील. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरेल.

Chhagan Bhujbal | Rajabhau Waje | Hemant Godse
Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी टाकला डबल केसरी डाव; विशाल पाटलांनी दिल्ली गाठली...

नाशिक मतदारसंघात 1996 पासून शिवसेनेने सातत्याने उमेदवार दिला आहे. 1996 मध्ये राजाभाऊ गोडसे, 1999 ॲड. उत्तमराव ढिकले, 2014 व 2019 मध्ये हेमंत गोडसे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा चित्र बदलले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाली आहे.

त्यांच्या विरोधात छगन भुजबळ असतील. ते भाजपच्या 'कमळ' की राट्रवादीच्या 'घड्याळ' चिन्हावर लढणार, हे एक दोन दिवसांत ठरेल. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी नाशिक मतदारसंघातील ही लढत अतिशय प्रतिष्ठेची आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाला साथ दिली होती. या पार्श्वभूमी राज्यातील परिस्थितीचा विचार करता ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार ही निवडणूक किती गांभीर्याने घेतात हा उत्सुकतेचा विषय आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Chhagan Bhujbal | Rajabhau Waje | Hemant Godse
Nashik Loksabha Election 2024 : छगन भुजबळांच्या उमेदवारीत 'हे' आहेत मोठे अडथळे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com