Nashik Lok Sabha Election : छगन भुजबळ नाशिकमधून कमळाच्या चिन्हावर लढणार?

Chhagan Bhujbal News : महायुतीच्या जागावाटपामध्ये नाशिक मतदारसंघावरून नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपामध्ये नाशिक (Nashik Constituency) मतदारसंघावरून नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला आहे. मुंबईत वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या चर्चेतून ही माहिती पुढे आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे, तर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केली आहे. यासंदर्भात येत्या 48 तासांमध्ये दोन्ही घटक पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारसंघ, उमेदवार आणि निवडणुकीचे चिन्ह यासंदर्भात काय निर्णय होतो? याची उत्सुकता अनेकांना आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आहेत. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि शिवसेना (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यामुळे मित्रपक्षातील नेत्यांनी नाराजी दर्शवली होती. शिवाय शिंदेंना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचंही भाजप आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गटाला द्यायला मित्रपक्षांचा विरोध असल्याचं उघड झालं होतं. अशातच आता भुजबळांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाने शिंदे गटात नाराजीची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक मतदारसंघ मिळावा, यासाठी महायुतीतील तीनही पक्षांनी त्यावर दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, अशी मागणी केली होती. तर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि खासदार हेमंत गोडसे तसेच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आमदार सुहास कांदे आदी नेत्यांनी या मागणीसाठी ठाणे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरले होते. त्यामुळे नाशिकची जागा महायुतीमध्ये युतीसाठी वादाचा विषय ठरली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये यंदा भुजबळांचे 'ओबीसी' कार्ड चालणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com