Jalgaon News : भाजपमध्ये पक्षांतराचा दुसरा अंक सुरू, मंगेश चव्हाण बजावणार गिरीश महाजनांची भूमिका?

Unmesh Patil News : उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला, तर भाजपला जळगावसह रावेर मतदारसंघाचा पेपर सोडवणं अवघड जाणार आहे.
eknath khadse unmesh patil mangesh chavan girish mahajan
eknath khadse unmesh patil mangesh chavan girish mahajansarkarnama
Published on
Updated on

भाजपच्या अंतर्गत वादात मुक्ताईनगरचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांचं विधानसभेचे तिकीट कापण्यात आलं. त्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता हाच वर्चस्वाचा वाद चाळीसगाव भाजपत निर्माण होऊन खासदार उन्मेश पाटील ( Unmesh Patil ) यांचं लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं. आता तेच उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अंतर्गत वर्चस्वाचा वाद आता भाजपला कुठे घेऊन जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जळगाव जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, पक्षाच्या अंतर्गत वादामुळे एक-एक जण नेते बाहेर पडले आणि जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत झाला. हाच कित्ता आता भाजप गिरवित असल्याचं दिसत आहे. जळगाव जिल्हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे. तब्बल दोन खासदार येथून 2019 मध्ये निवडून गेले होते. सध्या जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत. एकेकाळी यापेक्षाही अधिक आमदार भाजपचे निवडून जात होते. पक्ष वाढला म्हणजे नेतृत्वाची स्पर्धाही वाढते. तीच स्पर्धा जिल्ह्यातही झाली. भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) आणि गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांच्यात वर्चस्वावरून अंतर्गत वाद निर्माण झाले. त्यातून 2019 च्या विधानभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभेला पराभव झाला. त्यानंतर खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता हाच वर्चस्वाचा वाद चाळीसगाव तालुक्यातील भाजपमध्ये दिसत आहे. भाजपचे खासदार उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण हे एकेकाळचे जीवलग मित्र. परंतु, गेल्या पाच वर्षांत एकाच पक्षात राहून दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. मंगेश चव्हाणांनी एकनाथ खडसेंवर टीका करत आपले पक्षात वेगळे स्थान निर्माण केले. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चव्हाणांनी थेट खडसेंच्या पॅनेलचा पराभव करून आपल्या नेतृत्वाखाली सत्ता मिळवली. खासदार पाटील आणि आमदार चव्हाणांमध्ये सुरू असलेला वर्चस्वाचा वाद संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. पुढे हा वाद वाढत गेला.

eknath khadse unmesh patil mangesh chavan girish mahajan
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : "करारा जवाब दूंगा," विखेंचा लंकेंना थेट इशारा

उन्मेश पाटील ( Unmesh Patil ) यांची उमेदवारी पक्षानं कापली. वरिष्ठांनी वेगळ्या कारणानं पाटलांचं तिकीट कापलं असलं, तरी त्याला अंतर्गत वादाची किनार असल्याचं सांगितलं जातं. आता खासदारकीला संधी नाही, पुढं आमदारकीला चाळीसगावातून मंगेश चव्हाण आहेत. अशा स्थितीत पाटलांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निश्चित निर्माण झाला आहे. त्यामुळे 'आता नाही तर कधी नाही' या उक्तीनुसार पाटील पक्ष सोडण्याची शक्यता असून, शिवसेना ठाकरे गटात त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व शोधल्याचं बोललं जातं.

उन्मेश पाटलांबरोबर पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवारांसह आणखी काही कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं. करण पवार हे ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या मागे उन्मेश पाटील हे मित्रत्वाची ताकद उभी करणार आहेत. त्यामुळे भाजपला जळगाव नव्हे, तर रावेर मतदारसंघातही मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत वर्चस्वाचा जामनेर विरुद्ध मुक्ताईनगर नंतर आता चाळीसगाव विरुद्ध चाळीसगाव वादाचा दुसऱ्या अंकाचा शेवट होऊ शकतो.


( Edited By : Akshay Sabale )

R

eknath khadse unmesh patil mangesh chavan girish mahajan
Chandrakant Patil: एक रुपयाचेही काम केलं नाही; महायुतीतील आमदारानेच खडसेंना दाखवला आरसा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com