Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 4 डझन आमदार फोडले, 13 खासदार पळवले, तरीही ठाकरे शिंदेंना पुरुन उरले!

Lok Sabha Election 2024 Nikal : लोकसभा निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गट 13 जागांवर थेट लढत आहेत. यापैकी आठ जागांवर ठाकरेंच्या शिलेदारांची आतापर्यंत सरशी झाल्याचे पाहायला मिळते
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama

Lok Sabha Result And Maharashtra Politics : शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आपले वर्चस्व राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. महायुतीकडून शिंदे गट 15 जागा लढवत असून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने 23 जण रिंगणात उतरवले आहेत. आतापर्यंत आलेल्या आकड्यांनुसार शिंदे गट 5 तर ठाकरे गटाने 11 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येते.

लोकसभेत 13 ठिकाणी थेट शिंदे आणि ठाकरे आमनेसामने लढत आहेत. बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली, हातकणंगले, मावळ, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात थेट शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होत आहे. या लढती खरी शिवसेना कोणाची, हे ठरवतील, अशी चर्चा आहे. यातील बुलढाणा, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मावळ येथे शिंदे गट आतापर्यंत आघाडीवर आहे. तर उर्वरीत आठ मतदारसंघात ठाकरे गटाने बाजी मारली आहे.

शिवसेना फुटली आणि तिचे दोन गट पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट. पुढं कोर्ट कचेऱ्या झाल्या, निकाल लागला आणि शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळालं मात्र ‘खरी शिवसेना’ आमचीच हा उद्धव ठाकरे यांचा दावा आजही कायम आहेच. अखेर लोकसभा निवडणूक लागली आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार 13 मतदारसंघांत एकमेकांना भिडले. आता हे 13 मतदारसंघ खरी शिवसेना कुणाची? याचाही निकाल लावणार आहेत.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Nashik Lok Sabha 2024 Result : भुजबळ यांनी केला 'गेम'! गोडसेंना बसवले घरी; यंदा वाजेंची दिल्लीवारी ?

येथे ठाकरे आणि शिंदे गटात थेट लढत

1. बुलडाणा : प्रतापराव जाधव (शिंदे गट) Vs नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

2. यवतमाळ - वाशिम : राजश्री पाटील (शिंदे गट) Vs संजय देशमुख (ठाकरे गट)

3. हिंगोली : बाबूराव कदम (शिंदे गट) Vs नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)

4. हातकणंगले : धैर्यशील माने (शिंदे गट) Vs सत्यजीत पाटील (ठाकरे गट)

5. मावळ : श्रीरंग बारणे (शिंदे गट) Vs संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)

6. शिर्डी : सदााशिव लोखंडे (शिंदे गट) Vs भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

7. छ. संभाजीनगर : संदिपान भुमरे (शिंदे गट) Vs चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

8. नाशिक : हेमंत गोडसे (शिंदे गट) Vs राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)

9. कल्याण : श्रीकांत शिंदे (शिंदे गट) Vs वैशाली दरेकर (ठाकरे गट)

10. ठाणे : नरेश म्हस्के (शिंदे गट) Vs राजन विचारे (ठाकरे गट)

11. मुंबई दक्षिण : यामिनी जाधव (शिंदे गट) Vs अरविंद सावंत (ठाकरे गट)

12 मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिंदे गट) Vs अनिल देसाई (ठाकरे गट)

13. मुंबई उत्तर पश्चिम : रवींद्र वायकर (शिंदे गट) Vs अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Lok Sabah Election Result 2024 : भाजपला महाराष्ट्रात जोरदार झटका; चार मंत्री पिछाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com