Dindori Loksabha Nivadnuk Nikal 2024 : कांद्याने भाजपला रडवले आणि भास्कर भगरेंना डोक्यावर घेतले!

Mahavikas Aaghadi bhaskar bhagare winners in Dindori Constituency : हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. या सभेत देखील एका शेतकऱ्याने कांदा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून मोठा गदरोळ झाला.
bhaskar bhagare Dindori Constituency
bhaskar bhagare Dindori ConstituencySarkarnama

Dindori Lok Sabha Constituency winners News : लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीने भाजपला अक्षरशः रडवले.कांद्याच्या या उग्र राजकारणा पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील निष्प्रभ ठरली.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीआधी पासून कांदा निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क हा प्रश्न तीव्र बनला होता.कांद्याच्या राजकारणाच्या या उग्र दर्पाने भारतीय जनता पक्षाचे हातपाय लटपटत होते. निवडणूक निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे 1 लाख 13 हजार मतांनी विजयी झाले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यात बंदीमुळे भारतीय जनता पक्षाला पराभवाची चव चाखावी लागली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना 5 लाख 73 हजार 219 (46.55 टक्के) मते मिळाली. तर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना 4 लाख 59 हजार 914 (37.35 टक्के) मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे 1 लाख 13 हजार 305 मताधिक्याने विजयी झाले. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या मालती ढोमसे यांना 36 हजार 818 मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याशी नाम साधर्म असलेल्या बाबू सदू भगरे सर या उमेदवाराला आश्चर्यजनक 1 लाख 3 हजार 29 मते मिळाली.

या निवडणुकीत कांदा निर्यात बंदी हा अतिशय गंभीर प्रश्न झाला होता. निवडणुकीच्या आधी भारत जोडो यात्रे अंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवडला कांदा परिषद झाली होती. या प्रश्नावर सातत्याने आंदोलने झाली होती. त्याचा मोठा परिणाम मतदानावर झाल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसून आला. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. या सभेत देखील एका शेतकऱ्याने कांदा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून मोठा गदरोळ झाला.

bhaskar bhagare Dindori Constituency
Lok sabha Nivadnuk nikal: रामभूमीने भाजपला नाकारलं, राजाभाऊ वाजे 1 लाख 61 हजार मतांनी विजयी!

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेवटच्या आठवड्यात येथे तळ ठोकला होता. सर्व लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांना मुबलक रसद पुरविण्यात आली होती. मात्र त्याचा मतदानात परिणाम दिसून आला नाही. मतदारसंघात नितीन पवार, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असे चार आमदार अजित पवार गटाचे होते. शिंदे गटाचे सुहास कांदे आणि भाजपचे डॉ राहुल आहेत असे सर्व सहा आमदार महायुतीचे होते. असे असूनही भाजपच्या डॉ. पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांच्या प्रचाराची सूत्रे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्याकडे होती. शिवसेनेचे संपर्क नेते जयंत दिंडे यांनी भगरे यांच्या प्रचाराचे नियोजन केले. दत्तात्रय पाटील यांनी प्रचाराला गती दिली. यातून सर्व घटक आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाने प्रचार केला. यामध्ये अनेक ठिकाणी मतदारांनी उमेदवाराला आर्थिक मदत देखील केली. त्यामुळे एक प्रकारे मतदारांनी हाती घेतलेल्या या निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्याची संधी म्हणून पाहिले गेल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले.

(Edited by : Chaitanya Machale)

bhaskar bhagare Dindori Constituency
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : नगरमध्ये विखेंना 33 वर्षांनी पवारांनी अद्दल घडवली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com