Loksabha Election 2024 : लातूर भाजपचा मेळावा; कार्यकर्त्यांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला

BJP Melava लातूर लोकसभा निवडणुकीसाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा लातूर शहरातील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात झाला.
BJP Melava
BJP Melava sarkarnama
Published on
Updated on

-सुधाकर दहिफळे

Latur BJP News : भाजपाच्या लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या मेळाव्यात गर्दीचा फायदा घेत पाकीटमारांनी अनेक कार्यकर्त्यांचे खिसे रिकामे केले. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

लातूर लोकसभा निवडणुकीसाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा लातूर शहरातील भक्ती, शक्ती मंगल कार्यालयात झाला. आमदार रमेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास बहुजन कल्याण विकासमंत्री अतुल सावे, खासदार सुधाकर शृंगारे, दिलीपराव देशमुख, गोविंद केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, बब्रुवान खंदाडे, राहुल केंद्रे उपस्थित होते.

लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर, लातूर व औसा तालुक्यातील भादा सर्कलमधील गावातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास मोठी गर्दी केली होती. सभा सुरु होताना, सभेनंतर व भोजनस्थळी मोठी गर्दी झाली होती.

BJP Melava
Latur Congress News : काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांची घेतली भेट

या गर्दीचा फायदा घेत पाकीटमारांनी अनेक कार्यकर्त्यांच्या पाकीटावर डल्ला मारला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे खिसे रिकामे झाले. सभा संपल्यानंतर बाहेर येताच याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली. त्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले चेहरे घेऊन घराकडे परतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी भाजपाचा बुथप्रमुख असून, माझ्या खिशातील पाकिटात पाच हजार रुपये होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी माझे पाॕकेट पळवले. माझ्याच गावातील अन्य एका कार्यकर्त्यांचेही पाॕकेट मारले गेले.

- सोमनाथ फुलारी, खरोळा

Edited By : Umesh Bambare

BJP Melava
Latur Lok Sabha Election 2024 : लातुरात काँग्रेसचा प्रचार जोरात, भाजपचे श्रृंगारे अजूनही सायलेंट मोडवरच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com