Madhukar Pichad Passed Away: मोठी बातमी! भाजपचा झुंजार नेता हरपला; मधुकर पिचड यांंचं निधन

Madhukar Pichad Death : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचंं निधन झालं आहे. 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे.
Madhukarrao Pichad .jpg
Madhukarrao Pichad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचंं निधन झालं आहे. 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास राहिला होता. शुक्रवारी (ता. 6) सकाळपासूनच पिचड (Madhukar Pichad) यांची प्रकृती खालावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते.

मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड शिक्षक होते. कमलाबाई हे त्यांच्या आईचे नाव. मधुकर पिचड हे उच्च शिक्षित होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीए. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले होते. तेथूनच त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. मुलाच्या इच्छेखातर आपण भाजपमध्ये जात आहोत, असे सांगून मधुकरराव पिचड देखील भाजपमध्ये दाखल झाले होते.

मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली, तेव्हापासून मधुकरराव पिचड त्यांच्याबरोबर होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.. 1999, 2004, 2009, असे सलग तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले. यानंतर त्यांनी 2014 मध्ये त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून उतरवत विजयी केलं.

Madhukarrao Pichad .jpg
Devendra Fadnavis : महायुतीचा विजय अन् 'ईव्हीएम'वर शंका घेणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी मोजक्या शब्दांत फटकारले

मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकरराव पिचड यांचे सत्तेतील राजकीय प्रवास प्रदीर्घ, असा राहिलाय. माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले मधुकरराव पिचड 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.

मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. 1980, 1985, 1990, 1995 या चार पंचवार्षिमध्ये सलग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. या काळात त्यांना आदिवासी, आदिवासी विकास, दुग्धविकास, प्रवास विकास, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयात काम पाहिलं होतं.

Madhukarrao Pichad .jpg
Municipal Elections : कोल्हापुरात राजकारण फिरलं; महायुती फुटणार, महाविकास आघाडीलाही तडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com