Devendra Fadnavis : महायुतीचा विजय अन् 'ईव्हीएम'वर शंका घेणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी मोजक्या शब्दांत फटकारले

Mahayuti News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लागावला. ईव्हीएमवर आक्षेप घेण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव का स्वीकारावा लागला ? याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
Devendra Fadnavis 5
Devendra Fadnavis 5Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामध्ये ईव्हीएमचा मोठा वाटा आहे, अशी खोचक टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लागावला. ईव्हीएमवर आक्षेप घेण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव का स्वीकारावा लागला ? याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. (Devendra Fadnavis News )

गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शुक्रवारी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना विविध प्रश्नांना मनमोकळीपणे उत्तरे दिली. ईव्हीएमवर आक्षेप घेण्याची विरोधकाची भूमिका ही दुट्टपीपणाची आहे. झारखंडमध्ये काँग्रेस जिंकली. त्यावेळी तेथील ईव्हीएम चांगले तर महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) पराभव स्वीकारावा लागला तर ईव्हीएमवर आक्षेप घेणे, हे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis 5
Devendra Fadnavis : 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी...'; ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शपथविधीनंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मी त्याचवेळी..."

विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घेत असले तरी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख निवडून आले, त्यामुळे त्याठिकाणी ईव्हीएम चांगले होते तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख पराभूत झाले, त्याठिकाणी मात्र ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात आहे. ईव्हीएम तर सगळीकडे सारखेच होते. त्यामुळे असा आक्षेप का घेतला जातो? हेच समजत नाही.

Devendra Fadnavis 5
Nana Patole : निमंत्रण दिले असते, तर शपथविधीला गेलो असतो; नाना पटोलेंची गुगली

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी झाली. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा जागावर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्याठिकाणी सर्वच ईव्हीएमसारखेच होते. मात्र, या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेल्या ठिकाणीच आक्षेप घेतले जात आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पोस्टल मतावर याठिकाणी विजयी झाला आहे. त्यामुळे अशास्वरूपाच्या आरोपामध्ये काहीच तथ्य वाटत नसल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Devendra Fadnavis 5
Shivsena News : खातेवाटपावरून शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मंत्रिपदाचे वाटप करताना...'

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बसण्यापेक्षा या निवडणुकीत इतका दारुण पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करावे तर विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करण्याऐवजी आत्मचिंतन करावे, असा सल्ला फडणवीस यांनी यावेळी दिला.

Devendra Fadnavis 5
Shivsena Politics : शिवसेनाप्रमुख 'उप' नसतो, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणं शिवसैनिकांना आवडेल का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com