Nashik Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'मविआ'त खोडा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागेवर सांगितला दावा

Nashik Mahavikas Aghadi Seat Sharing : शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांसह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाच्या जागेवरच दावा केला. या नेत्याचा पुतण्या याआधीच भाजपमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नेत्याच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
Nashik NCP SP, Shivsena UBT Seat Sharing
Leaders of Mahavikas Aghadi and allied parties attend a crucial meeting to discuss seat sharing strategy ahead of the municipal elections in Nashik.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 28 Dec : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांनी सुरुवात केली. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा काल सायंकाळी झाले. माजी आमदार वसंत गीते यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांसह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाच्या जागेवरच दावा केला. या नेत्याचा पुतण्या याआधीच भाजपमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नेत्याच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या संदर्भात प्रारंभी शिवसेना मनसे यांनी दोन्ही काँग्रेसला प्रत्येकी सात जागांचा प्रस्ताव दिला. वादानंतर हा प्रस्ताव 10 जागांवर पोहोचला. मात्र नेमक्या जागा कोणत्या आणि उमेदवार निहाय चर्चा यावरून दोन्ही काँग्रेस नाराज झाल्या. दोन्ही काँग्रेस नाराज झाल्याने महाविकास आघाडीत चर्चेत मिठाचा खडा पडला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक सहाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक दावा ठोकला. त्यांच्या या दाव्याने चर्चा विस्कटली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी अचानक वेगळी भूमिका घेतली. ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे त्यांची साथ केलेल्या काँग्रेस नेतेही सावध झाले आहेत.

Nashik NCP SP, Shivsena UBT Seat Sharing
Pune BJP : पुण्यात कुटुंबातील उमदेवारांसाठी फिल्डिंग लावलेल्या आमदार-खासदारांना धक्का : मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पत्ते कट

यासंदर्भात चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आमदार सुनील भुसारा आज नाशिकमध्ये आहेत. या चर्चेत समेट घडवून आणतील, अशी चर्चा आहे. मविआच्या चर्चेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजाभाऊ वाजे.

Nashik NCP SP, Shivsena UBT Seat Sharing
MNS–UBT Alliance : मनसेने मागितलेल्या जागांनी शिवसेनेचे नेते शॉकमध्ये : सचिन अहिर अन् आदित्य शिरोडकर तातडीने पुण्यात

माजी आमदार व संत गीते, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी भाग घेतला. चर्चेत मतभेद झाल्यावर या नेत्यांनी काल सायंकाळी दूरध्वनीवरून पुन्हा एकदा चर्चा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com