MNS–UBT Alliance : मनसेने मागितलेल्या जागांनी शिवसेनेचे नेते शॉकमध्ये : सचिन अहिर अन् आदित्य शिरोडकर तातडीने पुण्यात

MNS–UBT Alliance Pressures MVA : 'मनसेची आघाडी ही काँग्रेसबरोबर नाही. आमची युती ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे. त्यांच्यासमवेत आम्ही निवडणुका लढविणार आहोत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.'
MNS and UBT PMC seat-sharing strategy
MNS and UBT leaders during a crucial meeting in Pune discussing seat-sharing strategy for the upcoming municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Dec : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (उबाठा) महाविकास आघाडीत पुणे शहरासाठी किमान ७० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी केली.

त्यातून निम्या जागा दोन्ही पक्षांना मिळतील, असेही मनसेने ‘उबाठा’च्या नेत्यांकडे नमूद केले आहे. त्यावर रविवारी (ता. २८) निर्णय होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना प्रत्येकी ५० जागा सोडण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

उर्वरित १२ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. ‘उबाठा’ला मिळणाऱ्या ५० जागांतून ‘मनसे’ला जागा सोडाव्यात, असे महाविकास आघाडीचे सूत्र आहे. मात्र, मनसेला २५ हून अधिक जागा हव्या आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीतील जागा वाटपाची माहिती मिळताच मनसे- उबाठातील घडामोडींना शनिवारी वेग आला.

MNS and UBT PMC seat-sharing strategy
Shahajibapu Patil : 'धनुष्यबाणाचे बटन दाबलेले स्वर्गात जाणार, दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे...' सांगोल्यातील विजयी सभेतून शहाजीबापूंनी विरोधकांचा हिशेब चुकता केला

‘उबाठा’चे संपर्क प्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर हे दुपारी पुण्यात आले. त्यांची आणि मनसेचे नेते बाबू वागस्कर तसेच बाळा शेडगे, अजय शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते, योगेश खैरे आदींची रावेतमध्ये बैठक झाली. त्यात ‘उबाठा’ने महाविकास आघाडीकडून किमान ७० जागा घ्याव्यात, अशी मागणी केली. त्यावर सचिन अहिर यांनी चर्चा करून निर्णय सांगू, अशी भूमिका घेतली.

MNS and UBT PMC seat-sharing strategy
Raigad murder case : मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या; कटाचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गुजरातमध्ये, व्हिडीओमधून म्हणाले...

या बाबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे म्हणाले, "मनसेची आघाडी ही काँग्रेसबरोबर नाही. आमची युती ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे. त्यांच्यासमवेत आम्ही निवडणुका लढविणार आहोत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. त्याचा महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com