Girish Mahajan : कृषिमंत्र्याच्या आधीच गिरीश महाजन पोहोचले बांधावर; शेतकरी म्हणाले, घोषणा नको मदत द्या!

Girish Mahajan Visits Farmers : कृषिमंत्र्यांच्या आधीच गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणांपेक्षा प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
Girish Mahajan agriculture news
Girish Mahajan Visits FarmersSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan on farmer issues: कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत आज कृषी आढावा बैठक होत आहे. पावसाने जिल्ह्यात ओढ दिली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या जिल्हा दौऱ्या आधीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला. एकीकडे गणपती मंडळांना भेटी देण्याचा उपक्रम केला. त्याचवेळी थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी चर्चा केली.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल नांदगाव, निफाड आणि चांदवड मतदार संघात दुष्काळाची पाहणी केली. थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार राहुल आहेर, आमदार सुहास कांदे यांसह विविध नेते त्यांच्या समवेत होते.

Girish Mahajan agriculture news
Raj Thackeray : 'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' विचारणाऱ्यांना राज ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "आयोगाकडून 'मॅच फिक्सिंग' पुराव्याने सिद्ध...'

नांदगाव तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने शेतकऱ्यांना मदतीबाबत धोरण व निर्णय करण्याची सूचना केली.

विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी दुष्काळाची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची दुरावस्था आणि अडचणी मांडल्या. दौरा झाला मात्र थेट मदत केव्हा करणार? अशी विचारणा देखील शेतकऱ्यांनी केली.

कृषिमंत्री दत्तात्रय भारणे यांच्या उपस्थितीत आज कृषी आढावा बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा झाला. आजच्या बैठकीत कृषिमंत्री दुष्काळावर उपाय योजनेसाठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com