Maharashtra Government : 24 तासांत राज्य सरकारचा यू-टर्न ! मंत्र्यांची छापील वृत्तपत्रे बंद करण्याचा निर्णय अखेर मागे

Maharashtra Government Reverses Printed Newspaper Decision : वृत्तपत्र खरेदीबाबत सरकारचा 24 तासांत अशंत: यू टर्न, आता मंत्र्यांना वृत्तपत्राचाही पर्याय असणार असून सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Government Reverses Printed Newspaper Decision
Maharashtra Government Reverses Printed Newspaper DecisionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Governme : मुख्यमंत्री वगळता अन्य मंत्र्यांची कार्यालये तसेच त्यांच्या शासकीय निवासस्थानावर येणारी छापील वृत्तपत्रे किंवा नियतकालिके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, वृत्तपत्रविक्रेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवल्याने सरकारने 24 तासांत यू टर्न घेत हा निर्णय मागे घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी केला.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात अंशतः बदल केला असून गुरुवारी जाहीर करण्यात आलेली केवळ ऑनलाइन सदस्यत्वाची अट मागे घेण्यात आली आहे. आता सर्वच मंत्र्यांना ऑनलाइन किंवा मुद्रित कोणत्याही प्रकारच्या सदस्यत्वाचा पर्याय उपलब्ध असणार आहे. संबंधित मंत्र्यांसाठी वृत्तपत्रांचा पर्याय पुन्हा खुला झाला आहे.

सरकारने निर्णयात बदल करताना ३० जुलैच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये सुधारणा केली आहे. उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालये तसेच शासकीय निवासस्थानी वृत्तपत्रे व नियतकालिकांसाठी ऑनलाइन किंवा मुद्रित यापैकी त्यांना सोयीचा वाटणारा पर्याय स्वीकारता येईल, असे स्पष्ट केले आहे.

Maharashtra Government Reverses Printed Newspaper Decision
Maharashtra Government : राज्य सरकारचा दात कोरून पोट भरण्याचा उद्योग? CM सोडून सर्व मंत्र्यांच्या निवास्थान अन् कार्यालयातील वृत्तपत्र बंद

मूळ निर्णयानुसार, केवळ मुख्यमंत्र्यांना या निर्णयातून वगळण्यात आलं होतं. तर, एक सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालये व शासकीय निवासस्थानी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचे सामान्य प्रशासन विभागाकडून होणारे वितरण बंद करण्यात येणार होते. त्याऐवजी संबंधित मंत्र्यांनी ऑनलाइन सदस्यत्व घ्यावे आणि त्याचा खर्च संबंधित खात्याच्या खर्चाच्या निधीतून करावा, असे निर्देश देण्यात आले होते.

Maharashtra Government Reverses Printed Newspaper Decision
Girish Mahajan : नाशिकच्या खड्ड्यांवरुन भुजबळांची फायरिंग; गिरीश महाजन म्हणतात भुजबळ साहेब म्हणतात ते बरोबर, यंत्रणेला 8 दिवसांचा अल्टिमेटम

या निर्णयामुळे खर्चात बचत होईल आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढेल, असा सरकारचा दावा होता. परंतु वाचनाचा पुरस्कार करणाऱ्या शासनाकडून हा वृत्तपत्र वाचनाला चाप लावण्याचा प्रयत्न असल्याची टीका करत वृत्तपत्रविक्रेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला दर्शवला. मूळ निर्णयाने वृत्तपत्रांची ऑनलाइन आवृत्तीवर बोळवण झाली असती, त्यातून हा वाद वाढण्याची चिन्हे होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com