JCB Attack Police : महसूलमंत्री बावनकुळेंच्या घोषणेनंतर काही तासांतच हल्ला; वाळूमाफियांनी पोलिसांवर घातला जेसीबी!

Hours after Maharashtra government announced crackdown on sand mafia, illegal miners allegedly tried crush police officers using JCB Ahilyanagar : अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी परिसरात अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर थेट जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
JCB Attack on Police
JCB Attack on PoliceSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Sand Mining News : राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळूमाफियांविरोधात कठोर कारवाईसाठी विशेष कृतीदल स्थापन करण्याची मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

मात्र या घोषणेला काही तासही उलटत नाहीत तोच अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रशासनालाच हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी परिसरात अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर थेट जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जेसीबी चालक आणि संबंधित मालकाविरोधात गंभीर गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.

पाथर्डीतील ढाकणवाडी शिवारातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, तिथे तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबीच्या सहाय्याने वाळू काढून ट्रॉलीमध्ये भरली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले.

JCB Attack on Police
Pathardi Gangrape Case : पाथर्डीत गँगरेप, पीडितेचं थेट पोलिस ठाण्यासमोर टोकाचं पाऊल; गोंधळात साथीदाराचा मृत्यू, 16 जणांवर अखेर गुन्हा

पोलिसांनी अचानक कारवाई सुरू करताच वाळूमाफियांनी वाहनांसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आजीनाथ खेडकर (रा. घाटशिळ पारगाव, ता. शिरूर कासार) याने स्वतःच्या ताब्यातील जेसीबी थेट पोलिस कर्मचारी संजय जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक विशाल लहाने यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

JCB Attack on Police
Shiv Sena Leader Attack : रॉड, दांडके, पिस्तुल अन् गँगवॉरचा अँगल? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवा नेत्यावर गोळीबारात नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा

क्षणाचाही विलंब न करता दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात उडी घेतली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि दोघांचे प्राण थोडक्यात बचावले.

जीवघेण्या हल्ल्यानंतरही पोलिसांनी माघार घेतली नाही. पुढील कारवाई करत पोलिसांनी दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून तब्बल 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी एका ट्रॅक्टरचा चालक अशोक शिरसाठ (रा. टेंभुर्णी, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला पोलिसांनी अटक केली.

पाच जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणी संतोष अर्जुन गिते (मुंगुसवाड), सुनील खेडकर (मालेवाडी), सचिन संजय मरकड (निवडुंगे), अशोक शिरसाठ आणि आजीनाथ खेडकर यांच्यासह संबंधित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूमाफियांचा उघड दहशतवाद

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत वाळूमाफियांना आळा घालण्यासाठी विशेष कृतीदल उभारण्याची घोषणा केली आणि काही तासांतच प्रशासनालाच उघड आव्हान देणारी ही घटना घडली. त्यामुळे राज्यात अवैध वाळू माफियांचे जाळे किती बिनधास्त झाले आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com