

Maharashtra ZP Elections : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. ९) जाहीर झाले. आता उर्वरित २० जिल्हापरिषदांच्या निवडणुका कधी होतात याकडे इच्छुकांचे लक्ष्य लागून आहे.
आरक्षणाची मर्यादा ओलंडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत अजूनही निकाल लागलेला नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २३ फेब्रुवारीला सुनावणी होणार असून, या सुनावणीवरच उर्वरित २० जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान, या निवडणुका साधारण इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षानंतर मार्च किंवा एप्रिलमध्ये होतील अन्यथा थेट दिवाळीनंतर होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी तयारी करणाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण सुनावणीच्या तारखा आणखी लांबल्यास निवडणुका आणखी लांबणार आहे.
या १२ जिल्हापरिषदांच्या निवडणुका झाल्या..
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. या १२ जिल्हापरिषदांपैकी सहा ठिकाणी भाजपने निर्भेळ यश मिळवले आहे. तर, शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन जिल्हापरिषदांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
कोणत्या जिल्हापरिषदेत कुणाचा विजय?
भाजप : सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर.
शिवसेना : रायगड, रत्नागिरी.
राष्ट्रवादी काँग्रेस : पुणे, कोल्हापूर. (त्रिशंकूः सातारा)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) : सांगली.
या जिल्हापरिषदांच्या निवडणुका बाकी
दुसरीकडे राज्यातील एकुण २० जिल्हा परिषदांचे ओबीसी आरक्षणाची टक्केवारी ही ५० टक्क्यांपुढे गेली आहे. यामध्ये यात नाशिक ७१ टक्के, धुळे ७३ टक्के, नंदुरबार १०० टक्के, जळगाव ५४ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आरक्षणाची टक्केवारी ४९ टक्के असली, तरी जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. तसेच पालघर ९३ टक्के, गडचिरोली ७८ टक्के, अमरावती ६६ टक्के, चंद्रपूर ६३ टक्के, यवतमाळ ५९ टक्के, अकोला ५८ टक्के, नागपूर ५७ टक्के, ठाणे ५७ टक्के, गोंदिया ५७ टक्के, वाशिम ५६ टक्के, नांदेड ५६ टक्के, हिंगोली ५४ टक्के, वर्धा ५४ टक्के, भंडारा ५२ टक्के, बुलढाणा ५२ टक्के इतके आरक्षण पुढे गेले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्यात घेतलेल्या जि. प. निवडणुकांमध्ये या जिल्हापरिषदांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.