SSC Supplementary Exam 2025: दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीत जाण्याचा मार्ग मोकळा! 'या' तारखेला होणार पुरवणी परीक्षा

Maharashtra Board re-exam Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 13) जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं. तर काही विद्यार्थी नापास झाले.
 SSC Supplementary Exam
SSC Supplementary ExamSarkarnama
Published on
Updated on

SSC Supplementary Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 13) जाहीर झाला.

या निकालात अनेक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं. तर काही विद्यार्थी नापास झाले. मात्र, नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी आणि अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे.

 SSC Supplementary Exam
Ration Card: राज्य सरकारचा सर्वात मोठा 'डिजिटल स्ट्राईक'; आत्तापर्यंत 18 लाख रेशनधारक ठरले 'अपात्र'; 31 मेपर्यंत संख्या वाढणार

त्यानुसार दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर जवळपास 86 हजार 841 विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत.

तर 34 हजार 393 विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली असून हे विद्यार्थी आता 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा देऊ शकतात. दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना 35 पेक्षा कमी गुण मिळालेत.

 SSC Supplementary Exam
Inter-caste marriage : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस अन् आयुक्तांची, राज्य सरकारचा मोठा निर्णय

अशा विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेता यावा आणि त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यांना पुन्हा एकदा दहावीची परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर ते विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com