
Varsha Gaikwad News : अवघ्या चार महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. ठाकरे बंधु एकत्र येणार की नाही याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र यावर देखील मतमतांतरे आहेत. त्यात काँग्रेसमध्ये अंतर्गतवाद असल्याने ते आगामी मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढणार असा प्रश्न होता.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपद खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसमधील नेत्यांनीच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. काँग्रेस विधानसभेला जिंकू शकत असलेल्या जागा गायकवाड यांनी ठाकरेंना दिल्या, असा आक्षेप देखील त्यांच्यावर घेण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड यांना हटवण्यात येऊन त्यांच्या जागी नवे नेतृत्व देण्याच्या चर्चा असताना खर्गे यांनी वर्षा गायकवाडांना अभय दिले आहे. राहुल गांधींशी चर्चा करून गायकवाड यांच्याकडेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व असल्याचे खर्गे यांनी निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईतील अंतर्गत वाद पालिका निवडणुकीपर्यंत शांत करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत वर्षा गायकवाड यांच्या विरोधात असलेल्या कुठल्याही तक्रारीवर चर्चा झाली नसल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये आहे. तसेच पालिका निवडणुकीसाठी बुथ बांधणी आणि कार्यकर्त्यांवर देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधुंसाठी ही मुंबई महापालिका निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती झाली तर उद्धव हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का? अशा देखील चर्चा आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.