Chagan Bhujbal :...तर प्रॉपर्टी विका अन् लढा; विरोधकांवर भुजबळांचे टीकास्त्र

Political News : भुजबळ येवल्यातील दौऱ्यावर आले अन् दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू झाले.
manikrao shinde, chganrao bhujbal
manikrao shinde, chganrao bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळांविरोधात येवल्यातील विरोधक सरसावले आहेत. त्यात माणिकराव शिंदे आघाडीवर असून, दोघे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भुजबळ येवल्यातील दौऱ्यावर आले अन् दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू झाले. जरांगे यांच्या हाती आसरी असून, भुजबळांची पतंग कटणार, अशी टीका माणिकराव शिंदे यांनी केली होती, तर प्रॉपर्टी विका अन् निवडणुका लढत राहा, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी केली.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवल्यात दाखल झालेल्या छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विरोधकांचे पतंग कापणार. अनेक वर्षांपासून ते काम सुरू आहे. पतंग कापण्याची ट्रेनिंग घेतली असल्याची टीका त्यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना माणिकराव शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

manikrao shinde, chganrao bhujbal
Konkan Politics: ठाकरे गटाची कोकणात जोरदार मोर्चेबांधणी; आमदार साळवींचा मंत्री सामंतांना सूचक इशारा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला आहे. २०२४ च्या निवडणुकीची आसरी जरांगे पाटील यांच्या हातात असून, भुजबळांची पतंग कापली जाणार, असा दावा शिंदे यांनी केला. त्यास सोमवारी सकाळी उत्तर देताना भुजबळांनी विरोधकांना फैलावर घेतले. त्यांना एकत्र येऊ द्यात. प्रॉपर्टी विका अन् निवडणुका लढा, असा सल्ला भुजबळांनी शिंदे यांचे नाव न घेता दिला.

राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर छगन भुजबळांविरोधात (Chagan Bhujbal) आरपारची लढाई करण्याचा पणच शरद पवार यांनी येवल्यात घेतला. त्यामुळे येवल्यातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष राहणार आहे, तर शरद पवारांच्या जाहीर भूमिकेमुळे भुजबळांचा एकछत्री अंमल असलेल्या येवल्यातील विरोधकांना बळ मिळाले. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला एकसंध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

माणिकराव शिंदे (Manikarao Shinde) हे आघाडीवर असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत असलेले दराडे बंधू भुजबळांसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर नरेंद्र दराडे यांच्याकडून त्यांचा मुलगा कुणाल याने विधानसभेसाठी तयारीसुद्धा सुरू केली आहे. अर्थात जागावाटपात काय होते, हे पाहणे कमालीचे उत्सुकतेचे असले तरी भुजबळांना येवल्यात आव्हान देणारे विरोधक उभे राहत आहेत हे विशेष आहे.

manikrao shinde, chganrao bhujbal
Chagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केलं; भूजबळांचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com