Chhatrapati SambhajiNagar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुतीच्या तीन पक्षांची एकत्रित बैठक आणि मेळावे रविवारी राज्यभरात एकाच दिवशी पार पडले. पण मराठवाड्यातील मेळाव्यांमध्ये प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीचीच चर्चा अधिक झाली. बीडमध्ये पंकजा मुंडे, तर लातूरमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या गैरहजेरीने भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीनाट्य यानिमित्ताने समोर आले.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात विजयाच्या संकल्पापेक्षा एकमेकांना टोले, टोमणे आणि चिमटेच अधिक काढण्यात आले. शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांना उद्देशून आमच्याकडेही लक्ष द्या, फक्त स्वतःचेच पाहू नका, असा चिमटा काढला. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होणार आहेत. तेव्हा फक्त लोकसभेवर लक्ष केंद्रित न करता आमच्याकडेही लक्ष द्या, असे शिरसाट यांनी स्टेजवरूनच कराड यांना सुनावले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही कराड-भुमरे शेजारी बसल्याचे पाहून तुमच्यापैकी कोणीही लोकसभा लढवा, मात्र जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्या, असा टोला लगावला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप लढणार की शिवसेना ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय शिरसाट यांनी कराडांना उद्देशून केलेल्या विधानामुळे तेच उमेदवार असतील, असे संकेतही दिले असल्याचे बोलले जाते. भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. या जागेवरूनच दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचीही चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जास्त ताणून न धरण्याचा स्वभाव पाहता ते ही जागा भाजपला सोडण्याची शक्यता अधिक असल्याचीही चर्चा आहे. महायुतीच्या मेळाव्यात व्यासपीठावर असलेल्या सर्वच नेत्यांनी विजयाचा संकल्प केला. पण स्थानिक पातळीवर महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अजूनही आपलेपणाची भावना दिसत नाही. व्यासपीठावर भाषण करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना तर आमदारांची नावेही नीट घेता आली नाहीत, हे पाहून नेत्यांनी डोक्याला हात मारून घेतला. त्यामुळे पहिल्याच महायुतीच्या मेळाव्यात हे चित्र दिसल्याने यांचा पुढचा प्रवास कसा असेल? याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे
(Edited By Roshan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.