Tipu Sultan Controversy: खासदार बच्छाव शान-ए-हिंद यांच्या पाठीशी; अमेरिकेच्या ट्रेड डीलवरून भाजपला थेट ललकारलं, `हिम्मत असेल तर...`

Malegaon Congress MP Dr Shobha Bachchan Support Deputy Mayor Shan-e-Hind Tipu Sultan controversy BJP-मालेगाव शहरातील टिपू सुलतान वादावर शान ए हिंद यांच्या मदतीला काँग्रेसच्या खासदार धावल्या
Shan-E-Hind Ahemed & Dr Shobha Bachhav
Shan-E-Hind Ahemed & Dr Shobha BachhavSarkarnama
Published on
Updated on

Dr Shobha Bachhav News: मालेगाव शहराच्या उपमहापौर शान ए हिंद या टिपू सुलतान फोटो प्रकरणावरून चर्चेत आहेत. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष त्यांच्याविरोधात आक्रमक आहे. त्यामुळे यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.  

मालेगाव शहराच्या उपमहापौर आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या शान ए हिंद सध्या चर्चेत आहेत. टिपू सुलतान यांच्या फोटो वरून भाजपने त्यांना टार्गेट केले आहे. भाजप समर्थक यावरून आक्रमक आहेत. 

भाजपने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या राजकारणाला काँग्रेसनेही तेवढ्याच कणखरपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते सपकाळ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Shan-E-Hind Ahemed & Dr Shobha Bachhav
Hindu Muslim tension Ahilyanagar : संग्राम जगतापांच्या उपस्थित पुतळा जाळला; काही तासांत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, मुस्लिम युवकांची प्रतिउत्तराची ठिणगी!

मालेगाव शहरात पेटलेल्या या राजकीय वादावरून उपमहापौर बचावात्मक स्थितीत आहेत. मात्र काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव त्यांच्या मदतीला धावून आल्या. खासदार डॉ बच्छाव यांनी भाजप जाणिवपूर्वक महिला उपमहापौर असल्याने त्यांच्या विकासाच्या कामात अडथळे आणत आहे, असे म्हणाल्या.  

Shan-E-Hind Ahemed & Dr Shobha Bachhav
Tipu Sultan controversy: वाद ‘टिपू’चा, निशाणा कुणावर? आंदोलनामागे संशयाची साखळी; शान-ए-हिंद थेट अ‍ॅक्शन मोडमध्ये!

भाजप हे संधीसाधू आणि स्वार्थी राजकारण करीत आले आहे. यापूर्वीही भाजपच्या नेत्यांनी मालेगाव शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. आता देखील खोटे बोलून आणि ज्या गोष्टी घडल्या नाही त्याचा डांगोरा पेटून भाजप राजकारण आणि आंदोलन करीत आहे. 

कार्यकर्त्यांनी उपमहापौरांना सत्कार म्हणून एक फोटो भेट दिला. तो त्यांनी कार्यालयात लावला. यावरून भाजपने एवढा डांगोरा पिटण्याचे कारण नाही. यापूर्वी भाजपने टिपू सुलतान यांचे नाव ठिकठिकाणी देण्याचा प्रस्ताव केलेला आहे. मग भाजपचे खरे रूप कोणते? 

राज्यात कांदा उत्पादक संकटात आहेत. बेरोजगारी, महागाई, महिलांचे प्रश्न असे कितीतरी गंभीर विषय आहेत. केंद्रातील सरकारने अमेरिकेशी ट्रेड एग्रीमेंट अर्थात व्यापार करार केला. त्यामुळे देशातील शेतकरी संकटात आला आहे. एक प्रकारे अमेरिकेत पुढे पंतप्रधान आणि केंद्र सरकारने शरणागती पत्करली आहे. त्याचा फटका देशातील सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. हिम्मत असेल तर भाजपने त्यावर भूमिका मांडावी.

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केलेली नाही. भाजप यावर खोटा प्रचार करीत आहे. सामान्यांच्या भावनांशी खेळणे हा या पक्षाचा अजेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठी आराध्य आहेत. ब्रिटिशांच्या विरोधात टिपू सुलतान यांनी प्रखर संघर्ष करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टिपू सुलतान यांचे ते योगदान नाकारता येईल का? असा प्रश्न त्यांनी केला. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com