Tipu Sultan controversy: वाद ‘टिपू’चा, निशाणा कुणावर? आंदोलनामागे संशयाची साखळी; शान-ए-हिंद थेट अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Malegaon Samajwadi Party Deputy Mayor Shan-e-Hind Anger at police Tipu Sultan controversy-उपमहापौरांचा आरोप, काही संघटनांकडून माझ्या विरोधात जाणीवपूर्वक राजकारण होत आहे.
Deputy-Mayor-Shan-E-Hind
Deputy-Mayor-Shan-E-HindSarkarnama
Published on
Updated on

Shan-e-Hind News: मालेगावच्या उपमहापौर कार्यालयातील टिपू सुलतान फोटोचा वाद सुरूच आहे. यावर रोज नवे राजकारण होत आहे. आता या संदर्भात थेट पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.  

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए- हिंद निहाल अहमद यांनी टिपू सुलतान वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी ओबीसी प्रवर्गातील महिला आहे. त्यामुळेच आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. 

भारतीय जनता पक्षाने सिन्नर, पिंपळगाव बसवंत यांचं ठिकठिकाणी आंदोलन केले. टिपू सुलतान यांची प्रतिमा लावणे गैर असल्याचा दावा भाजपने केला. या संदर्भात काँग्रेस पक्षावरही टीका करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानाबाबत खेद व्यक्त केला आहे. 

Deputy-Mayor-Shan-E-Hind
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांना मुख्यमंत्री फडणवीसांसह पक्षातील नेत्यांवर भरोसा, बदनामीचा कट वाटत नाही

टिपू सुलतान वादावर मालेगाव शहरात कालही प्रतीकात्मक आंदोलन झाले. टिपू सुलतान वादाच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी महापौरांना छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने कार्यालयातील प्रतिमेचा वाद संपवावा, असे आवाहन केले होते. 

Deputy-Mayor-Shan-E-Hind
Police Crime: धक्कादायक! पोलिसांच्या तिजोरीवर दरोडा, कोट्यवधींची अफरातफर, उपनिरीक्षक बेपत्ता

या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्या म्हणाल्या, राष्ट्रपुरुष कोण आणि त्यांच्या कामकाजाची सर्व माहिती ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे. शासनाकडेही ती सहज उपलब्ध आहे. असताना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेबाबत जाणीवपूर्वक काही संघटना वाद निर्माण करीत आहेत. 

हे सर्व आंदोलन विशिष्ट हेतूने केले जात आहे, असे उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी केले. पोलीस आणि प्रशासनाला याची जाणीव आहे. असे असताना प्रशासन आंदोलनाला परवानगी देतेच कशी?. त्या मागचा हेतू काय? असे त्या म्हणाल्या. 

मालेगाव उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली होती. ही प्रतिमा शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमहापौरांनाभेट म्हणून दिली होती. ती त्यांनी कार्यालयात लावली. त्यातून हिंदुत्ववादी संघटनांनी उपमहापौरांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्यावरून राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला. तो अद्यापही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यावर उपमहापौरांनी आंदोलनाला परवानगी देणाऱ्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com