Malegaon Namaz Controversy : मालेगाव नमाज पठणाचा वाद; महाविद्यालयातही उमटले पडसाद! हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!

Namaz Controversy  Hindutva Aggressive : Malegaon News : मालेगाव महापालिकेत नमाज पठाणाच्या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Malegaon Namaz Pathan FIR
Malegaon Namaz Pathan FIRSarkarnma
Published on
Updated on

Malegaon News : मालेगाव शहरातील नवाज पठणावरून पेटलेला वाद आणि रंगलेले राजकारण आता थेट महाविद्यालयांच्या आवारात पोहोचले आहे. त्यामुळे याबाबत विविध संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने मालेगाव शहरात नमाज पठणावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. नमाज पठणाच्या विरोधात हनुमान चालीसा पठण केल्यानंतरही त्यांची आक्रमकता कमी झालेली नाही. त्यामुळे हा राजकीय वाद आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

मालेगाव महापालिकेत एका समुदायाच्या नागरिकांनी नमाज पठण केले. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. यावरून प्रशासन तसेच राजकीय पक्षांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांनी नमाजपठण केल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. सात जणांना याबाबत ताब्यात घेण्यात आले.

हिंदुत्ववादी संघटनांनी नमाज पठणाला विरोधक करत आक्रमक भूमिका घेत संबंधित कार्यालयात हनुमान चालीसा पठण केले. त्यानंतर एका व्यावसायिक संस्थेत देखील नमाज पठाण करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय स्वरुप आले आहे.

Malegaon Namaz Pathan FIR
Ali Khamenei Death : मुलीला मारलं, जावयालाही मारलं… आता खामेनेईंच्या संपत्तीचा वारसदार कोण? एकूण नेटवर्थ किती?

नाशिकच्या संदीप इन्स्टिट्यूट या व्यवसायिक संस्थेतही नमाज पठण करण्यात आले होते. वस्तीगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी नमाज पठण केले. ही माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी हनुमान चालीसा पठाणकरी त्याला प्रत्युत्तर दिले.

Malegaon Namaz Pathan FIR
paper leak Case : बारावी पेपरफुटीनंतर मुख्याध्यापक अन् शिक्षकाला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड; ‘रनर’ने...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com