paper leak Case : बारावी पेपरफुटीनंतर मुख्याध्यापक अन् शिक्षकाला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड; ‘रनर’ने...

Nagpur paper leak investigation : नागपुरमध्ये बारावीचा फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स विषयाचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर आता बोर्डाने आता संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
paper leak
paper leaksarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयांच्या पेपरफुटीमुळे परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  2. ‘रनर’ निवड प्रक्रियेत त्रुटी असल्याचा संशय व्यक्त करत बोर्डाने तपास सुरू केला आहे.

  3. कस्टोडियन आणि केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन उर्वरित परीक्षांसाठी कडक सुरक्षा उपाय लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Nagpur News : नागपूर बारावीच्या विज्ञान विषयांच्या पेपरफुटीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक केली. त्यामुळे आता बोर्ड अलर्ट मोडवर आले असून ‘रनर’द्वारे हा प्रकार घडल्याची शक्यता बोर्डाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातून बोर्डाने कस्टोडियन ते केंद्रप्रमुखांच्या बैठका घेऊन सूचना दिल्याची माहिती आहे.

बारावीचा फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स विषयाचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली असून मुख्याध्यापकाने प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने हा पेपर फोडल्याची बाब समोर आली. बोर्डाकडून ‘रनर’ निवडताना कुठलेही नियम नाही. त्यामुळे झालेली पेपरफूट ही ‘रनर’च्या मदतीने झाल्याची शक्यता बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे उरलेल्या पेपरदरम्यान असा कुठलाही प्रकार होऊ नये यासाठी बोर्ड ‘अलर्ट’ मोडवर आले आहे. त्यामुळे कस्टोडियन ते परीक्षा केंद्र संचालक यातील प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी बोर्डाकडून आता कडक पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी शनिवारी (ता.२८) सर्वच कस्टोडियन आणि केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली. तसेच, त्यांना सूचनाही देण्यात आल्यात.

paper leak
HSC Paper Leak: मुख्याध्यापक, शिक्षकानेच फोडला 12वीचा पेपर; मोठं रॅकेट उघड

विभागीय चौकशी होणार

पेपरफुटीच्या प्रकरणावर बोर्डाने आता संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी बोर्डाकडून लवकरच एक समिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पेपरफुटीमुळे बोर्डाची नाचक्की झाली आहे. त्यामुळे पेपर फोडणारा तो ‘घरका भेदी कोण?’ याचा शोध घेण्यात येणार आहे.

असे होणार बदल

कस्टोडीअनकडून ‘रनर’चे लाइव्ह लोकेशन घेण्यात येणार, प्रश्‍नपत्रिका देताना व्हिडिओ तयार करावा लागणार, केंद्रावर प्रश्‍नपत्रिकेचा लिफाफा फोडताना, त्याचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करावे लागणार.

paper leak
HSC Exam Paper Leak: बारावीचे दोन नव्हे तीन पेपर फुटल्याने खळबळ; तपासात धक्कादायक बाब समोर

FAQs :

1. कोणते पेपर फुटल्याचा आरोप आहे?
बारावीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

2. पेपरफुटी कशी झाली असावी?
‘रनर’च्या मदतीने प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

3. बोर्डाने कोणती पावले उचलली आहेत?
बोर्ड ‘अलर्ट’ मोडवर असून सुरक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी कडक उपाय जाहीर केले आहेत.

4. कोणाची बैठक घेण्यात आली?
सर्व कस्टोडियन आणि परीक्षा केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या.

5. पुढील पेपर सुरक्षित राहतील का?
बोर्डाने कडक उपाययोजना केल्याने पुढील पेपरदरम्यान अशा घटना टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com