Kirit Somaiya: 'किरीट सोमय्या हिंदूंचेच...' म्हणत माजी आमदार आसिफ शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Kirit Somaiya, Asif Shaikh, SIR Campaign: माजी आमदार आसिफ शेख यांनी किरीट सोमय्या यांच्यावर एसआयआर मोहिमेच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना लक्ष्य केल्याचा आरोप केला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
Kirit Somaiya Nashik flood controversy
Kirit Somaiya Nashik flood controversySarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेच्या आडून मालेगावमधील मुस्लिम मतदारांना टार्गेट करत असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. सोमय्या सातत्याने मालेगावसारख्या मुस्लिम बहुल शहरांचे दौरे करून येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या या मोहिमेतून मुस्लिम मतदारांची नावे वगळली जावीत, यासाठी सोमय्या भाजपचे स्थानिक नगरसेवक आणि नेत्यांना कानमंत्र देत असल्याचा आरोप करत आसिफ शेख यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली.

निवडणूक आयोगाकडून राज्यात एसआयआर मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मतदार यादीतून मुस्लिम मतदार वगळावेत यासाठी सोमय्या भाजप नगरसेवक आणि नेत्यांना कानमंत्र देत आहेत. या पार्श्वभूमीवर इस्लाम पक्षाचे नेते आणि मालेगाव शहरातील माजी आमदार आसिफ शेख चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या हे बेवकूफ आहेत. ते मुस्लिम नागरिकांना टार्गेट करतात. एसआयआर मोहीम सुरू आहे. त्याचा पूर्ण अभ्यास आम्ही केला आहे. मालेगाव शहरात १.२६ लाख मतदार संशयास्पद ठरविण्यात आले आहेत. हे मतदार बांगलादेशी आहेत असा आरोप सोमय्या करतात. असे माजी आमदार शेख म्हणाले.

Kirit Somaiya Nashik flood controversy
Malegaon SIR Drive: `इस्लाम` पक्षाच्या आसिफ शेख यांची मालेगावात व्युहरचना, `एसआयआर`चा हल्ला परतवण्यासाठी केली ही जोरदार तयारी!

मात्र निवडणूक आयोगाच्या या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोहीम राबविली आहे. त्यात नाशिक शहरातील पूर्व मतदारसंघात १.०२ लाख मतदार संशयास्पद ठरविले आहेत. जवळपास प्रत्येक मतदारसंघात किमान ५० हजार मतदारांवर ही कारवाई होत आहे.

जिल्ह्याच्या मतदारसंघात देखील मतदारांची नावे संशयास्पद ठरविण्यात आली आहेत. ते मतदार मुस्लिम आहेत का? त्यामुळे किरीट सोमय्या हे बेवकूफ व्यक्ती आहेत. ते मुस्लिम मतदारांना टार्गेट करतात हा त्यांचा भ्रम आहे. त्यांच्या मोहिमेने हिंदू मतदारांचेच मोठे नुकसान होत आहे, याकडे शेख यांनी लक्ष वेधले.

Kirit Somaiya Nashik flood controversy
Nashik MLC: 'इस्लाम'चे आसिफ शेख हे काय करून बसले?, सेक्युलर, सेक्युलर म्हणत नगरसेवकांचा कळप हिंदुत्ववाद्यांच्या दारी घेऊन गेले!

यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देखील आपण तक्रार करणार आहोत. सोमय्या धर्माच्या आधारावर भेदभाव करतात. सामान्यांची दिशाभुल करतात. निवडणूक आयोगाच्या कामकाजात अडथळे आणतात. त्यामुळे सोमय्या यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कारवाई करावी. सोमय्या यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com