Manikrao Kakate : कोकाटेंना मोठा दिलासा ! अजित दादांनी फक्त कानच टोचले..

Manikrao Kokate meets Ajit Pawar : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी अभय दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा राजीनामा न घेता केवळ त्यांना समज देण्यात आल्याचे कळते.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kakate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रोहित पवारांनी हा व्हिडीओ समोर आणला होता. यादरम्यानच कोकाटे यांनी सरकार भिकारी आहे असंही वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा असा दबाव विरोधकांकडून आणला जात होता. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे आज (दि. २९) निर्णय घेणार होते. त्यानुसार कोकाटे व अजित पवार यांच्यात आज बैठक पार पडली.

या बैठकीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे याहीवेळेला कोकाटे यांचे कान टोचले. त्यांना खडेबोल सुनावले. पण कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोकाटे यांचा राजीनामा घेतो पण त्याआधी शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा घ्या, अशी अट अजित पवारांनी ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे तुर्तास कोकाटे यांच्या राजीनाम्याला ब्रेक मिळाला असल्याचे समजते.

अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये कोकाटे याच्यासोबत एका तास चर्चा झाली. या बैठकीत अजित दादांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. बोलताना भान ठेवा. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं सुनावलं. आता माझ्या हातात काही नसून तुम्हाला किती वेळा वाचावायचं? किती वेळा सांभाळून घ्यायचं..अन् किती वेळा माफ करायचं..? असा सवाल करत खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. कोकाटे यांचे कान टोचत त्यांना समज देण्यात आली आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
Eknath Khadse : खडसेंनी पोलिसांनाच खेचलं आरोपीच्या पिंजऱ्यात.. म्हणाले माझा जावई नावाजलेला!"

कोकाटे यांच्या संदर्भात अजित पवारांनी पक्षातील नेत्यांसोबतही चर्चा केली. त्यात कोकाटे यांचे काम चांगले असून त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना आणखी एक संधी देऊ असं मत मंत्र्यांनी मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांनी कोकाटे यांना अभय देण्याचा विचार केला असल्याची माहिती आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोकाटे यांच्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
Nashik News : कुंभमेळ्याच्या तोंडावरच नाशिकच्या पुरोहित संघातील वाद पेटला, विझवता विझेना..

दरम्यान कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार नाही असे आश्वासन त्यांनी अजित पवार यांना दिले. या सगळ्या घडामोडी घडत असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले होते. त्यांनीही कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ नये अशी विनंती अजित पवार यांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com