Sinnar APMC News : सत्तेसाठी माणिकराव कोकाटेंना अपेक्षा चमत्काराची!

सिन्नर बाजार समितीत समान संचालक निवडून आल्याने सत्तेचा तिढा
Rajabhau Waje & Manikrao Kokate
Rajabhau Waje & Manikrao KokateSarkarnama

अजित देसाई

Sinnar APMC election : सिन्नरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे पारंपारीक प्रतिस्पर्धी आहेत. बाजार समितीच्या निवडणुक तालुक्याचे राजकीय रागरंग दाखवणारी ठरली. दोघांचे बलाबल समसमान आहे. त्यामुळे आता सभापती पदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांना चमत्काराची अपेक्षा आहे. (Both group of Sinnar politics excepting miracle)

सिन्नर (Sinnar) तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीच्या (APMC election) सभापती निवडणुकीत कार्यकर्ते, नेत्यांची उत्सुकता सतत वाढत आहे. संख्याबळ समसमान आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला चमत्काराची अपेक्षा आहे.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Sharad Pawar Retirement News: रोजंदारीचे कामगार देखील म्हणतात, पवार साहेबच हवेत!

या निवडणुकीचा निकाल सत्ताधारी कोकाटे गटासाठी अनपेक्षित राहिला आहे. मात्र वाजे-सांगळे गटासाठी वाढलेले संख्याबळ बेरजेच्या राजकारणात अपेक्षा उंचावणारे ठरले आहे. दोन्ही गटांनी समान नऊ जागा जिंकल्यामुळे आता सभापती-उपसभापती पदाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वांनाच चमत्काराची अपेक्षा आहे. बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी उभय गटांकडून विविध पर्यायांवर चाचणी केली जात असून अंतिम वेळी मात्र चिठ्ठीचा कौल मान्य करण्याची मानसिकता दाखवावी असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला जात आहे.

बाजार समितीत गेली तीन पंचवार्षिक आमदार माणिकराव कोकाटे यांची एक हाती सत्ता राहिली गत निवडणुकीत तत्कालीन आमदार असलेले राजाभाऊ वाजे यांच्या गटाला बाजार समितीत शिरकाव करता आला. काम झालं मात्र सत्ताधारी कोकाटे गटाकडून विरोधक म्हणून निवडून आलेल्या संचालकांची कोणतीही दखल घेतली गेली नव्हती यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवायचीच असा चंग बांधत विरोधकांचा गट सुरुवातीपासूनच सक्रिय झाला होता.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Sameer Bhujbal News: नांदगावमध्ये २०२४ चा गुलाल महाविकास आघाडीवरच पडणार!

निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला सहकारी संस्था गटात आमदार कोकाटे गटाचे पारडे जड असल्याची अटकळ सर्वांनीच बांधली होती तर ग्रामपंचायत व वैयक्तिक गटात वाजे सांगळे गटाला झुकते माप राहील असा अंदाज होता प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा कोकाटेंच्या बाजार समितीतील एक हाती सत्तेला सुरुंग लावण्याचे आपले मनसुबे वाजे गटाने दाखवून दिले.

सोसायटी गटात ११ पैकी तीन जागा जिंकून घेत वाजे-सांगळे गटाने सत्ताधाऱ्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे ग्रामपंचायत गटातील चार व व्यापारी गटातील दोन जागांवर वाजे गटाचे वर्चस्व राहिले. मापारी-तोलारी गटातील एक जागा केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोकाटे गटाच्या पारड्यात पडली. या निवडणुकीत 'हम भी कम नही' हे वाजे-सांगळे गटाने दाखवून दिले आहे. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने आमदार कोकाटे गटाने सत्ता हस्तगत केली. आता बाजार समितीच्या निवडणुकीत एखादा चमत्कारच कोकाटे गटाची सत्ता अबाधित राखू शकणार आहे.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
APMC Result : महाविकास आघाडीचा डंका तर शिंदे-भाजप आघाडी जमिनीवर!

खुद्द आमदार कोकाटे सिन्नर पंचायत समितीचे सभापती असताना व गेल्या काळात बाळासाहेब वाघ यांची सभापती पदी वर्णी लावत असताना बहुमतासाठी उमेदवारांची पळवा पळवी झाल्याचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती बाजार समितीतील सत्ता स्थापनेसाठी होईल काय याकडे सम्पूर्ण तालुक्याचे लक्ष आहे. काठावर उत्तीर्ण झाल्यामुळे सत्तेसाठी कोकाटेंसोबतच वाजे गटाचे देखील हौसले बुलंद झाले आहे.

बहुमतासाठीच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात असून त्यासाठी दोनही गटातील राजकीय चाणक्य कामाला लागले आहेत. अर्थात ही खेळी कितपत यशस्वी होईल याबाबत दोनही गटांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी एखादा चमत्कार सत्तेपर्यंत पोहोचवणारा ठरेल. किंबहुना चिट्ठीचा कौल वेळप्रसंगी मान्य करण्याचा सल्ला दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Sinnar APMC News : `या`मुळे निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना धक्का?

आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर बाजार समितीचे सभापती पद भूषवलेले विठ्ठल राजेभोसले, नामदेव शिंदे, अरुण वाघ, लक्ष्मण शेळके यांची साथ वाजे गटाला मिळाली. हे अनुभवी सहकारी एका मागोमाग कोकाटेंपासून दुरावले. तर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पदावर असलेले बाळासाहेब वाघ यांनी देखील काडीमोड घेतला.

आमदारांचे बंधू भारत कोकाटे हे देखील कौटुंबिक कलाहामुळे फारकत घेऊन वाजेच्या गोटात यापूर्वीच सामील झाले आहेत. हे सर्वजण वाजे4-सांगळे गटासाठी एकत्रित व्यूहरचना आखत होते. त्यांच्या दिमतीला निवडणुकांचा अनुभव असलेली चाणक्यांची कुमक होती. या सर्वांच्या जोरावरच बाजार समितीत कोकाटे यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com