BJP Crisis : भाजपमध्ये भूकंप! ‘शिवसेनेच्या खुंटीला पक्ष बांधला’ म्हणत 50 पदाधिकाऱ्यांचा एकत्रित राजीनामा, आणखी बंडाची चिन्हे

Mass resignations in Manmad BJP over alleged Shiv Sena dominance : मनमाड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 50 निष्ठावंतानी राजीनामे दिले आहेत.
Suhas Kande, Girish Mahajan
Suhas Kande, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : मनमाड नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. निवडणुकीच्या तोंडावरच भाजपच्या शहरातील सुमारे 50 पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनमाडमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे गट)ची युती झाली आहे. त्यानुसार भाजपला 15 ते 20 जागा मिळणे अपेक्षित असताना केवळ चारच जागा दिल्या आहेत. येथे आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढवत आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवारही शिवसेनेचा आहे. त्यामुळे पक्षाला शिवसेना (शिंदे गटाच्या) खुंटीला बांधून ठेवल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून आणू न शकलेल्या पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर या पदाधिकाऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिला आहे.

Suhas Kande, Girish Mahajan
Rohit Pawar : सयाजी शिंदेंना रोहित पवारांची साथ, नाशिकमधील वृक्षतोडीवरुन गिरीश महाजनांना घेरलं..

भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना असून भाजप मंडल पूर्व चे माजी अध्यक्ष सचिन संघवी यांनी पत्रकारपरिषद घेत पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतरही भाजपला एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता, असाही आरोप संघवी यांनी केला. तसेच आणखी ५० कार्यकर्ते भाजपचा राजीनाम देणार असल्याचे संघवी यांनी सांगितले.

Suhas Kande, Girish Mahajan
Suhas Kande : मनमाडचा किंग राजकारणातून आउट, सुहास कादेंनी केला करेक्ट कार्यक्रम

मनमाडमध्ये भाजपचे गणेश धात्रक हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांनाही एबी फॉर्म दिला नाही. अपक्ष भरलेला फॉर्मही धात्रक यांनी माघारी घेतला. शिवसेनेपुढे धात्रक यांनी एकप्रकारे शिवसेनेपुढे नांगी टाकली. धात्रक यांचे अनेक समर्थक उमेदवारी न मिळाल्याने समीर भुजबळ यांच्या नेतृत्वातील गटात म्हणजे राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. त्यामुळे मनमाडमध्ये भाजपची ही अवस्था नक्की कुणामुळे व कशी झाली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com