Maharashtra viral Audio Clip : जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपचे नाशिक कनेक्शन? विरोधात बैठक घेणारे नेते कोण?

Maharashtra politics, Maratha agitation, Nashik meeting, Maratha reservation movement : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा नाशिकमध्ये झाला होता प्रयत्न.
manoj jarange patil
manoj jarange patilsarkarnama
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. या ऑडिओ क्लिप वरील आरोपांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेषत: महायुतीमध्येच मोठा वाद उफाळून आला आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पडद्यामागून सूत्रे हलविण्यात आली. त्यात दिल्लीतील भाजप नेत्यांकडून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 500 कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्याने मोठी खळबळ उडाली.

दसऱ्याच्या मुहूर्तावर या आरोपाने नव्या राजकीय वादाला तोंड फोडले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर गंभीर आरोप केले. त्याला भाजप नेत्यांनी त्याच तीव्रतेने उत्तर दिले होते. विरोधी पक्षांनाही या निमित्ताने एक नवे शस्त्र मिळाले. सत्ताधारी भाजपचे नेते त्या आरोपांनी गोंधळले होते. याबाबत महायुतीत समेट झाला आहे. परस्परांवर आरोप प्रत्यारोप न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता ऑडिओ क्लिप आणि त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप याचे नाशिक कनेक्शन चर्चेत आले आहे. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले. त्याला फाटे फोडण्यासाठी नाशिकमध्ये मराठा नेते म्हणवून घेणाऱ्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. न्यायप्रविष्ठ असलेल्या एस.ई.बी.सी आंदोलनाचा मुद्दा पुढे करून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला होता.

manoj jarange patil
वडिलांची राहुल गांधींशी हातमिळवणी; भाजपमधील माजी खासदार लेकीवर संशयाची सुई...

नाशिकचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार नाहीत, अशी घोषणा सतत इलेक्ट्रॉनिक मीडियात चर्चेत राहणाऱ्या व महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजप प्रवेश केलेल्या या वादग्रस्त नेत्यांनी केली होती. जरांगे पाटील यांच्यावर आरोप करून आंदोलनाला वेगळी दिशा देणाऱ्या या नेत्याला ऑडिओ क्लिप मधील चर्चेनुसार लाभ तर मिळाला नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

manoj jarange patil
कॉक्रोच जनता पार्टीसमोर राहुल गांधीही फेल, भाजप तर कोसो दूर

समाज माध्यमांवर या नेत्याने केलेल्या घोटाळ्यांचे आणि त्याच्यावर दाखल गुन्ह्यांच्या पोस्ट देखील जरांगे समर्थकांनी व्हायरल केल्या होत्या. ऑडिओ क्लिपचे राजकारण चर्चेत आल्याने नाशिक मधील ती बैठक आणि त्या नेत्याचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com