Gulabrao Patil: शिवसेनेच्या मंत्र्याला डीजेचा दणदणाट भोवला! सांगितली आपबिती पुतण्याच्या लग्नात नाचलो अन् ऐकण्याची क्षमता 40% घटली

Gulabrao Patil DJ Statement: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांनी डीजेच्या दणदणाटाचा वैयक्तिक अनुभव सांगत, एका कानाची ऐकण्याची क्षमता ४० टक्के घटल्याचे नमूद केले आणि तरुणांना सावध केले.
Gulabrao Patil DJ Statement
Gulabrao Patil DJ StatementSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra DJ Controversy: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सणाचा उत्साह कायम ठेवताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन शिवसेनेचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, डीजेच्या प्रचंड आवाजामुळे आपल्या डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा वैयक्तिक अनुभव त्यांनी सांगितला.

भादली बुद्रूक (ता. जळगाव) येथे पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना साज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी काही वर्षांपूर्वी पुतण्याच्या लग्नातील प्रसंग सांगितला.

नातेवाईकांच्या आग्रहाखातर आपण लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचत होतो. मात्र, डीजेचा आवाज अत्यंत मोठा असल्याने त्यांच्या डाव्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर आजही त्या कानाने सुमारे ४० टक्के कमी ऐकू येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यासह राज्यातील विविध भागांत डीजे-डॉल्बीच्या वापरावरून वाद सुरू आहेत. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी लावून धरली असून, काही गणेशोत्सव मंडळांनी त्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांच्या वैयक्तिक अनुभवामुळे डीजेच्या आरोग्यावरील परिणामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कमी ऐकू येत असल्याने डॉक्टरांनी कर्णयंत्र वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, लोक आपल्याला ‘बहिरा’ म्हणतील, या विचाराने आपण कर्णयंत्र वापरत नसल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. दुसऱ्या कानाने व्यवस्थित ऐकू येत असल्याने दैनंदिन कामकाजात फारशी अडचण येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Gulabrao Patil DJ Statement
Teachers News: डोंगरी, दुर्गम शाळांना मिळणार गुरुजी! कोल्हापूर जिल्ह्यात 410 शिक्षकांची नियुक्ती

डीजेच्या मोठ्या आवाजाचा परिणाम केवळ कानांपुरता मर्यादित नसून लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच उच्च रक्तदाब आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, असे पाटील यांनी सांगितले. मोठ्या आवाजामुळे अस्वस्थता, ताण आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषणाचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रखर लेझर लाइट्सबाबतही त्यांनी सावध केले. अशा प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असल्याने मंडळांनी त्याचा वापर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Gulabrao Patil DJ Statement
Tukaram Mundhe: शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी!’ तुकाराम मुंढेंनी समाजाच्या मानसिकतेवरच बोट ठेवलं; पोस्ट व्हायरल

गणेशोत्सवात डीजेच्या ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सव साजरा करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आनंद साजरा करताना इतरांच्या आरोग्याचा विचार करणे गरजेचे असून, तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com