Manoj Jarange Yeola Rally
Manoj Jarange Yeola RallySarkarnama

Manoj Jarange Yeola Rally : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंचा गुलाल; येवल्यात विजयी सभा घेणार...

Manoj Jarange Yeola Rally On Maratha Reservation : मनोज जरांगे भुजबळांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देणार...
Published on

Maratha Reservation Politics : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्यांच्या या डावपेचाला आव्हान देण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघातील सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत विजयी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. (Manoj Jarange Yeola Rally)

Manoj Jarange Yeola Rally
'आम्ही जे करतो तेच भुजबळ...' जरांगेंनी हल्लाच चढवला | Manoj Jarange On Chhagan Bhujbal |

मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल राज्य शासनाने घेतला. या निर्णयाला ओबीसी नेते व मंत्री भुजबळ यांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर हरकती घेण्याचे नियोजन करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. असे असतानाच त्यांच्या मतदारसंघात मात्र सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण मिळाल्याने विजयसभा घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कालच जरांगे-पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला. येत्या आठवड्याभरात ही सभा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संयोजकांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात येवला आणि लासलगाव भागातील सकल मराठा समाजातर्फे सक्रिय सहभाग आणि मदत करण्यात आली होती. मुंबईच्या आंदोलनातदेखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच आवश्यक असलेली अन्य मदत देण्यात आली होती. त्यामुळे आरक्षण देण्याचा मसुदा जाहीर केल्यावर त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Manoj Jarange Yeola Rally
Chhagan Bhujbal : मराठा समाजानं काय कमावलं अन् काय गमावलं ? भुजबळांनी हिशेबच केला

लासलगाव येवला भागातील देवगाव, लासलगाव, विंचूर, हनुमाननगर, मरळगोई, गोंडेगाव, खडक माळेगाव, विष्णुनगर, विंचूर चौक, येवला तसेच अन्य भागांत काल कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने जल्लोष करीत मिरवणूक काढल्या. एकंदरच मराठा आरक्षण मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यासंदर्भात डॉ. सुजित गुंजाळ, विकास रायते, ललित दरेकर, प्रवीण कदम, राजू भडांगे, शंकर दरेकर, राजेंद्र दरेकर, हर्षल काळे, तुषार थेटे, प्रमोद पाटील, गोपीनाथ ठुबे, अमित मजगुले, वैभव तासकर, ज्ञानेश तासकर, अभिजित डुकरे यांसह मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जल्लोष यात्रेत सहभागी झाले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com