Maratha Reservation: भुजबळांच्या मतदारसंघात मराठा आंदोलक झाले आक्रमक!

Maratha community followers took a serious step in Yeola-मनोज जरांगे- पाटील यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाले.
Maratha agitation at Yeola
Maratha agitation at YeolaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Yeola Politics News : ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते चांगेलच आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. (Maratha reservation agitation is more aggressive in Bhujbal`s constituency)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी येवला (Yeola) येथे गेल्या ३१ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. आता हे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) या प्रश्नावर इशारा दिला आहे.

Maratha agitation at Yeola
Congress Nashik News : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचे पुढचे पाऊल काय?

आंतरवेली सराटे (जालना) येथे बेमुदत उपोषण करणारे मनोज पाटील यांना पाठींबा देण्यासाठी येवला येथे आंदोलन सुरू करण्यात आले होते. अन्न व नागरि पुरवठा मंत्री भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व देण्यात आले होते.

जरांगे-पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. येथे सभा देखील घेण्यात आली होती. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला ३१ दिवस पूर्ण झाले. त्यानंतर सध्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत थेट अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्यागाचा आज चौथा दिवस होता. त्यामुळे विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलस्थळी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला आहे.

सकल मराठा समाजातर्फे संजय सोमासे, निंबाजी फरताळे, विजय मोरे, गोरख संत, रवींद्र शेळके, जांलिदर मेंढकर, विष्णु चव्हाण आदींनी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू केले आहे. समाजाला न्याय मिळावा, तसेच स्थानिक प्रश्न सुटावेत, या मागणीसाठी हे आंदोलन आहे. आता अधिक टोकाचे पाऊल उचलत आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग सुरू केले आहे. त्यांची प्रकृतीही खालावू लागली आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत उत्सुकता आहे. ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलन तीव्र केल्याचे श्री. सोमासे यांनी सांगितले.

Maratha agitation at Yeola
Eknath Khadse News : एकनाथ खडसे कुटुंबीयांना तब्बल १३७ कोटींचा दंड?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.