मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण केल्याचा दावा आज केला. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी थेट सरकारला कैचीत पकडले आहे. सरकारने आरक्षण कसे दिले हे स्पष्ट का केले नाही, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षणासाठी 'सगेसोयरे' या शब्दाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने आज अधिसूचना काढली. त्याची प्रत आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवी मुंबईतील आंदोलनस्थळी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) वचनपूर्ती केल्याचा जाहीर दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
त्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट सरकारवर पलटवार केला आहे. आधी सरसकट आरक्षण देणार होता, त्याचे काय झाले, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. शिवाय राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण कसे दिले, हे अजून स्पष्ट केलेले नाही. आरक्षण देताना नेमके ओबीसींना फसवले की मराठ्यांना? असाही सवाल पटोलेंनी केला आहे. त्याचवेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपोषणस्थळी का गेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Manoj Jarange-Patil)
विशेष म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले जीआर ही फसवाफसवी असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. यापूर्वी फडणवीसांनीही असाच अध्यादेश काढला होता. शिंदेंनी त्याची पुनरावृत्ती केली, असा आरोप पटोलेंनी केला आहे. काँग्रेसच्या (Congress) उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठकीसाठी पटोले धुळ्यात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी ही कडक प्रतिक्रिया दिली.
यावेळी नाना पटोले यांनी भाजपवरही (BJP) टीकेचा असूड ओढला. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेणे ही भाजपाची नीती आहे, असा आरोप त्यांनी केला. रामापेक्षा मोठे झाल्याचा त्यांचा आविर्भाव आहे. भाजप मूळ मुद्दे सोडून इतर मुद्यांवर लक्ष वळवत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उत्तर प्रदेशची बुलडोझर पद्धत मुंबईतील मीरा रोडमध्ये आणली. ही हुकूमशाहीची मानसिकता आहे. हे रावणापेक्षाही वाईट राज्य आहे, अशी टीकेची झोड पटोलेंनी भाजपप्रणीत महायुती सरकारवर उठवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.