Maratha Reservation : 'इम्पेरिकल डाटा’ सर्वेक्षणासाठी 22 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Empirical Data Nagar Survey : राज्यभरात इम्पेरिकल डाटा गोळा केला जात आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू असून या सर्वेक्षणासाठी 127 प्रश्न आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : मराठा आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगून मनोज जरांगे-पाटील यांनी त्या लढाईची धार वाढवली आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटाही गोळा केला जात आहे. नगर जिल्ह्यात मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पेरिकल डाटा गोळा केला जात आहे. यासाठी सात दिवसांत घरोघर सर्वेक्षण होणार असून, यासाठी 22 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. (Maratha Reservation: Appointment of 22 thousand employees in nagar for 'empirical data' survey)

राज्यभरात इम्पेरिकल डाटा गोळा केला जात आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी 127 प्रश्न आहेत. नगर जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख आहे. या आधारावर सुमारे 9 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Shivsena News : काय हा योगायोग... दानवेंच्या मुलाच्या लग्नात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?

नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हास्तरावर मुख्य नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत राहणार आहेत. शहरी भागाकरिता महापालिका आयुक्त, इतर ग्रामीण भागात उपजिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील विविध भागांचे अधिकारी नोडल अधिकारी असणार आहेत.

या सर्वेक्षणासाठी मागसवर्ग आयोगाने निकष निश्चित केले आहेत. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजासाठी संगणकप्रणाली आणि ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर ही माहिती संकलित केली जाणार आहे. सात दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रमुख अधिकारी यांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत.

या सर्वेक्षणासाठी 21 हजार 908 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वेक्षण वेगाने होण्यासाठी तलाठी, पोलिसपाटील आणि कोतवाल यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तदेखील घेतला जाणार आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनासाठी मुंबईत 'या' तीन मैदानांची पाहणी

सर्वेक्षणाचे काम हे कर्मचारी करणार

सर्वेक्षण निकोप पद्धतीने व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना दिल्या आहेत. महापालिका, नगरपालिका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षकांची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल.

Edited By : Vijay Dudhale

Maratha Reservation
Sharad Pawar - Pankaja Munde Meeting: पवारांची भेट अन् पंकजा मुंडे आपल्याच सरकारविरोधात झाल्या आक्रमक; म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com