Shivsena News : काय हा योगायोग... दानवेंच्या मुलाच्या लग्नात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?

Shinde-Thackeray Will Come Together : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज आणि रश्मी यांच्या विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. तसेच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास आशीर्वाद देणार आहेत. (Will Shinde-Thackeray come together in Ambadas Danve's son's wedding?)

शिवसेनेत बंड झाल्यापासून एकमेकांना पाण्यात पाहणारे आणि संधी मिळेल तेव्हा वाभाडे काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरात आज एकत्र येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुठल्याही राजकीय नेत्याच्या घरातील आनंदाच्या क्षणी मतभेद विसरून सगळे नेते एकत्र येतात, असे चित्र अनेकदा दिसले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Maratha Reservation : मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनासाठी मुंबईत 'या' तीन मैदानांची पाहणी

राज्यातील महाविकास आघाडी पाडून शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड केल्यापासून या दोन्हीही गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. संधी मिळेल तेव्हा एकमेकांचे वस्त्रहरण करण्यासाठी हे नेते आसुसलेले असतात. येत्या दहा जानेवारी रोजी शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेच्या कारवाईवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात दोन्हीही शिवसेनेचे प्रमुख नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी एकत्र येणार आहेत.

उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा निश्चित झाला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना टाळणारे शिवसेनेचे हे बडे नेते आज एकाच व्यासपीठावर दिसतील का? की मग वेळांची चुकामूक करीत एकत्र येणे टाळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Vijaysinh Mohite Patil : सरपंच ते उपमुख्यमंत्री...यशस्वी राजकारणी : विजयसिंह मोहिते पाटील

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाहता आजच्या विवाह सोहळ्यात दोन्ही बाजूंच्या नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधींची देहबोली ते एकमेकांशी हस्तांदोलन करतात का? बोलतात का, याकडेही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Bazar Samiti Extension : देशमुख, राऊतांना मुदतवाढीचा बूस्टर डोस; निवडणुकीत आर्थिक केंद्र राहणार हाती

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार राजकीय कलगी-तुरा रंगला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत, अशा वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले तर हे चित्र कसे असेल? याचीही उत्सुकता ही दोघांच्या समर्थकांना लागली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Daund NCP : अजितदादांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयात राडा; राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com