Maratha Reservation: आम्ही कुणबी, भुजबळांना सांगा आमच्या बांधावर येता कशाला?

Maratha Reservation issue, Maratha community aggressive against Bhujbal in Yeola-शेतकऱ्यांची पोलिसांना विनंती, आमचा निरोप कळवा, भुजबळ येणार असतील तर आम्ही रात्रभर रस्त्यावरच बसून राहू!
Chhagan Bhujbal & Protester
Chhagan Bhujbal & ProtesterSarkarnama
Published on
Updated on

Maratha v/s Chhagan Bhujbal : येवला मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मतदारसंघातील मराठा समाजाचा राग कायम आहे. गुरुवारी भुजबळ दौऱ्यावर येणार असल्याने बुधवारी रात्रीच सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत पाटोदा लासलगाव रस्ता बंद केला. (Maratha community followers appeal, Chhagan Bhujbal shall not come to Farmers)

मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा आजपासून येवला मतदारसंघात (Nashik) अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा दौरा सुरू झाला. मात्र हा दौरा सुरवातीपासूनच वादाचा विषय ठरला आहे. दौऱ्याला विरोध म्हणून लासलगाव परिसरातील ४६ गावांतील मराठा बांधवांनी (Maratha) काल बैठक घेऊन भुजबळ यांनी आमच्या बांधावर येऊ नये, असा इशारा दिला होता.

Chhagan Bhujbal & Protester
Maratha v/s Bhujbal : भुजबळांची आंदोलकांना हुलकावणी, वेगळ्याच मार्गाने निघून गेले!

मंत्री भुजबळ रात्री येणार अशी कुणकूण लागल्या बुधवारी रात्री दहालाच परिसरातील शेतकरी विंचूर चौफुलीवर मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी रस्ता बंद केल्यावर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आम्ही सर्व कुणबी आहोत. भुजबळ साहेब कुणबींना विरोध करतात. त्यांना सांगा आमच्या शेतावर येऊ नका. आम्ही गुण्यागोविदांने नांदतो आहोत. तुम्ही आले की, वाद होणार, आमच्या पोराबाळांवर गुन्हे दाखल होणार, त्यातून काय साध्य होईल.

यावेळी शेतकरी म्हणाले, चार महिने पाऊस नव्हता, तेव्हा भुजबळ फिरकले नाही. मराठा समाजाच्या पोराबाळांच्या भविष्यासाठी आम्ही आरक्षण मागतो, तर हे विरोध करतात. आता येऊन ते काय करणार?. त्यांनी दहा हजार एकरी दिले तरी आम्हाला नको आहेत. संकटे आणि नुकसानीची आम्हाला सवयच झाली आहे. दारीद्रय आमच्या पाचवीला पुजले आहे. आता केवळ आरक्षण हेच आमचे भविष्य असेल. पंचनामे तहसीलदार करतात. निर्णय जिल्हाधिकारी घेतात. ते आले तर ढोल, ताशे घेऊन त्यांचे स्वागत करू, मात्र भुजबळ यांनी येऊच नये, अशा विविध शेलक्या शब्दांत शेतकरी पोलिसांकडे आपला संताप व्यक्त करीत होते.

Chhagan Bhujbal & Protester
Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या खासदारांना राष्ट्रपतींकडून समन्स

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com