प्रदीप पेंढारे -
Ahmednagar News: मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले आहे. राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यातच काही नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
आता अहमदनगर महापालिकेचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मदन आढाव यांनी नगरसेवक पदाबरोबर शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त आणि पक्षाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. याशिवाय भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनीही नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलन मराठवाड्यात आणि विदर्भात पेटले आहे. राजकीय कार्यालयाबरोबर आमदारांचे घर, कार्यालय आणि बंगले पेटवली गेली आहेत. या आंदोलनाचा धसका आता राजकीय नेत्यांनी घेतला आहे.
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. यानंतर आता नगर शहरातील महापालिकेचे शिंदे गटाचे नगरसेवक मदन आढाव यांनी राजीनामा दिला आहे. नगरसेवकाबरोबरच शिवसेना पक्षाचाही राजीनामा त्यांनी पक्षाकडे पाठवला आहे.
"मराठा समाजाला आरक्षण देत नाही. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या होत आहेत. आता यापुढे मराठा आरक्षण एवढेच आपले ध्येय असणार आहे", असे मदन आढाव यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राजकीय नेते पदाधिकाऱ्यांना याची झळ बसण्याची शक्यता आहे. यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आपले भ्रमणध्वनी बंद करून ठेवणं पसंत करत आहेत.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.