Malegaon education scam: धक्कादायक; आमदार मुफ्ती यांचा दावा, मालेगावात १२२ कोटींचा शिक्षक भरती घोटाळा?

Maulana Mufti Ismail;Scam of Rs 122 crore in teacher recruitment in Malegaon, MLA Maulana Mukti alleges -आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र देत केली कारवाईची मागणी
Maulana-Mufti-Ismail-Asif-Shaikh.jpg
Maulana-Mufti-Ismail-Asif-Shaikh.jpgSarkarnama
Published on
Updated on

MIM Maulana Mufti News: गेली काही वर्ष मालेगाव शहर सातत्याने विविध राजकीय वाद विवादांनी चर्चेत राहिले आहे. आता येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांशी संबंधित शाळांमधील घोटाळा चर्चेत आला आहे. याबाबत आजी-माजी आमदार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

मालेगाव शहराचे आणि एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केलेल्या शैक्षणिक संस्थांवरील आरोपाने खळबळ उडाली आहे. शहरातील विविध शैक्षणिक संस्था अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावाखाली गैरप्रकार करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत लवकरच शासकीय यंत्रणा या संस्थांवर कारवाईचा बडगा उभारतील असा दावा त्यांनी केला.

Maulana-Mufti-Ismail-Asif-Shaikh.jpg
Pahalgam Terror Attack: भाजप नेते सावजी म्हणतात, 'त्या अमानुष प्रवृत्तींचा बिमोड करावाच लागेल'

मालेगाव शहरातील विविध शैक्षणिक संस्था अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश आणि शिक्षण देण्याच्या नावाखाली वेगवेगळे गैरप्रकार करीत असल्याचे बोलले जाते. यामध्ये शिक्षकांना विना पगारी राबवून घेतले जाते. प्रदीर्घकाळ नोकरी केल्यानंतर जेव्हा पद आणि निर्मितीला मान्यता मिळते तेव्हा शिक्षण संस्था चालक घोटाळे करतात.

Maulana-Mufti-Ismail-Asif-Shaikh.jpg
Jalgaon Honor Killing : प्रेमविवाह केल्याचा राग, सेवानिवृत्त CRPF अधिकाऱ्याने भरलग्नात मुलीसह जावयावर झाडल्या गोळ्या

मालेगाव शहरात शिक्षकांची भरती करताना विना पगारी आणि प्रदीर्घकाळ राबलेल्या शिक्षकांवर अन्याय केला जातो. शासनाची मान्यता मिळाल्यावर हे संस्थाचालक नव्या शिक्षकांकडून पैसे घेऊन त्याची भरती करतात. यामध्ये १२२ कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा आमदार मौलाना मुक्ती यांनी केला.

यासंदर्भात नुकतेच संबंधित मंत्री नितेश राणे आणि अन्य खात्याच्या मंत्र्यांना पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे. या मंत्र्यांना पत्र देऊन संबंधित संस्था चालकांवर कठोर कारवाई करावी. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याऐवजी या संस्था गैरव्यवहार करतात, याविषयी त्यांनी खंत व्यक्त केले.

मालेगाव शहराचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी हा प्रश्न उचलताच त्याला लागलीच विरोधकांकडून राजकीय प्रत्युत्तर मिळाले आहे. या संदर्भात माजी आमदार असिफ शेख यांनीही संबंधित शिक्षण संस्था चालकांना या आरोपांना पुढे येऊन उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. अशा शिक्षण संस्थांच्या पाठीशी उभे राहून संघर्ष करू असे माजी आमदार शेख यांनी सांगितले.

या संदर्भात काही हिंदुत्ववादी संघटनांनी देखील गेल्या आठवड्यात अल्पसंख्यांक समाजाशी संबंधित संस्था चालकांवर गंभीर आरोप केले होते. शिक्षक भरती प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला होता. राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आता हा प्रकार बांगलादेशी, आणि रोहिंग्या मुस्लिमांशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे मालेगावच्या राजकीय नेत्यांना शिक्षक भरती घोटाळ्याचा एक नवा विषय चर्चा चर्वनाला उपलब्ध झाला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com