Nashik News : गोपीचंद पडळकरांच्या सभेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता; गोडसे, बिश्नोईचे फलक झळकल्यानं खळबळ

Gopichand Padalkar Sabha : पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 पर्यटकांची हत्या केली होती. तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सिडको येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.
Nashik News .jpg
Nashik News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमधील सिडको येथे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेध करण्यासाठी 'हिंदू विराट' सभा झाली. मात्र, या सभेत नथुराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचे फलक झळकल्यानं नाशिक (Nashik) शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सिडकोत बुधवारी (ता.15) झालेल्या हिंदू विराट सभेला मंत्री दादा भुसे,आविष्कार भुसे, शिवसेनेचे दीपक बडगुजर,भाजपचे व्यंकटेश मोरे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जय भवानी,जय शिवाजी,हर हर महादेव आणि 'जय श्रीराम'च्या घोषणांनी परिसरातील वातावरण दणाणून गेले. मात्र, यावेळी सभेमध्ये नथुराम गोडसे,कुख्यात गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई यांचे फलक झळकावण्यात आले.

याप्रकरणी आता अंबड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी यासंदर्भातला एक गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे पाठवला आहे. या धक्कादायक प्रकारासंबंधी चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती हांडे यांनी दिली आहे.

Nashik News .jpg
Eknath Shinde Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंनी नाशिकवरचा फोकस वाढवला; शिवसैनिकांना दिले मोठे आदेश

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 पर्यटकांची हत्या केली होती.तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सिडको येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.

या सभेत पडळकरांनी देशातील हिंदू समाजाचे अस्तित्व संकटात असल्याचं म्हटलं.पण याच सभेत समर्थकांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवले. मुंबईतील एका राजकीय नेत्याच्या हत्येसह विविध अभिनेते आणि व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. या प्रकारामुळे नाशिकमध्ये पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com