Chhagan Bhujbal : 'पंतग कसे कापतात, याचं ट्रेनिंगच घेतलंय' ; छगन भुजबळांचं सूचक विधान!

Maharashtra Politics : 'कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी मला काही फरक पडणार नाही.' असंही भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nahik News : 'मी येवल्यात पतंग उडवण्यासाठी आलो आहे. यापूर्वी अनेकांचे पतंग कापले. यापुढेही कापतच राहील. इतरांचे पतंग कसे कापायचे याचे ट्रेनिंग घेतले आहे. असे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले आहे.

तसेच, 'कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी मला काही फरक पडणार नाही. येवला-लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. नायलॉन वापरावर बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात.' अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray : नाशिकच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; ग्रामीण भागात...

मी येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला आलो आहे. पतंग उडवताना अनेकांचे पतंग कापले आहे. यापुढेही येथेच राहणार आहे. अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचे ट्रेनिंग घेतले असल्याचे सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना यावेळी इशारा दिला. भुजबळ(Chhagan Bhujbal) रविवारी येवल्यात पोहचले यावेळी पत्रकारपरिषदेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून येवल्यातच त्यांना विरोधाचा सामना यापूर्वी करावा लागला. पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पवारांची मोठी सभा आयोजीत केली होती. भुजबळाविरूद्ध माझी लढाई येवल्यातूनच सुरू करीत असल्याचे आव्हान पवारांनी त्यावेळी दिले होते. दरम्यान, राजकीय विरोधक आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा भुजबळ येवल्यात कसा हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal
Mahayuti Melava: महायुतीच्या मेळाव्याला आमदार लंके, काळे, लहामटेंची दांडी; विखेंनी समन्वयकांनाच धरले जबाबदार

दरम्यान, दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड (गिसाका) कंपनी ईडीच्या ताब्यात आहे. कर्ज प्रकरणी आम्हाला नोटीस मिळाली असली तरी पुढील कार्यवाहीबाबत ईडीला विचारावे लागले," असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. भुजबळांच्या या प्रतिक्रियेमुळे जिल्हा बँक आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बड्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यात भुजबळ कुटुंबियांचाही समावेश आहे. त्यांच्या मालकीच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रकक्चर प्रा. लिमीटेड कंपनीकडील 51 कोटी 66 लाख रूपयांची थकबाकी असून, ती वसुल करण्यासाठी बँकेकडून हालचाली सुरू केल्यात. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com