Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत, उपचार घेत शहीद जवानाच्या अंत्ययात्रेत सहभागी

Minister Girish Mahajan Injured : शहीद जवान बाविस्कर यांच्या परिवाला भेट देत महाजन यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवचन महाजन यांनी दिले
Girish Mahajan
Girish Mahajansarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News : डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने जलसंपदा गिरीश महाजन यांना दुखापत झाली आहे. वरणगाव येथील शहीद जवान जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत असताना ते मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागले. त्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले

महाजन यांना दुखापतीनंतर वरणगाव येथील रुग्णालया नेण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, मंत्री महोदयांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. मात्र महत्त्वाची बैठक असल्याने महाजन हे पुढे नाशिककडे रवाना झाले.

Girish Mahajan
Uddhav Thackeray Sena News : राजकीय दंगलीत आत्मबलिदान करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला उद्धव ठाकरे सेनेचा मदतीचा हात

बाविस्कर यांच्या परिवाला भेट देत महाजन यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवचन महाजन यांनी दिले.दरम्यान, डोक्याला दुखापत झालेली असतानाही महाजन अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत ते चालत गेले, तिथे हजारो वरणगावकरांच्या उपस्थित मानवंदना दिली.

नेत्यांनी नेले रुग्णालयात

गिरीश महाजन यांना डोक्याला लागल्यानंतर रक्तस्त्राव थाबंत नव्हते तेव्हा भाजपचे शहाराध्यश्र सुनील माळी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढेआदींनी आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी महाजन यांा जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर ते पुन्हा अंत्ययात्रेत सहभागी झाले.

Girish Mahajan
High Court News : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना खंडपीठाची नोटीस!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com